येन्सा ग्रामपंचायतचे सरपंच रवि भोयर पदावरून पायउतार होणार ?

110

ब्रेकिंग :- येन्सा ग्रामपंचायतचे सरपंच रवि भोयर पदावरून पायउतार होणार ?

वामन दादा काळे यांची पुराव्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार. सहा महिन्यात होईल कारवाई ?

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि: 30 अगस्त 2022

वरोरा प्रतिनिधी :-

सविस्तर बातमी:- तालुक्यातील येन्सा या गावाचे सरपंच रवि पंढरी भोयर (वय 48 वर्ष) यांना दोन पत्नी पासून तीन अपत्य असताना त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढली व त्यांनी आपल्या नामनिर्देशन अर्जात फक्त दोन अपत्य असल्याची माहिती भरून तिसरे अपत्य लपवले. शिवाय त्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून शासनाच्या निवडणूक लढण्याच्या पात्रता अटी आणि शर्ती याचा भंग केल्याने त्यांना सरपंच व सदस्य पदावरून पायउतार करण्यात यावे अशी मागणी वामन दादा काळे यांनी पुराव्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे त्यामुळे सरपंच रवि भोयर यांना सरपंच पदावरून पायउतार होण्याची नामुष्की येणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

 

वरोरा तालुक्यातील येन्सा या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रवि पंढरी भोयर यांना वेणू नावाच्या पहिल्या पत्नी पासून रंजीत (जन्म दिनांक: 19/7/1999) नावाचा मुलगा आहे तर नंदा या दुसऱ्या पत्नी पासून रुपाली ( जन्म दिनांक 24/8/2001) व ममता (जन्म दिनांक :-14/9/2003) नावाच्या दोन मुली आहे. पण ग्रामपंचायत निवडणुकीत तीन अपत्य असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरता येत नाही त्यामुळे गैरअर्जदार यांनी नंदा या दुसऱ्या पत्नीपासून असलेल्या ममता या मुलीच्या जन्म दाखल्यावर स्वतःचे नाव रवि ऐवजी रवींद्र व वडिलांचे पंढरी ऐवजी भदुजी नमूद केले जेणेकरून त्यांना निवडणूकीत अपात्र करण्यात येऊ नये. रवि भोयर यांच्या दुसऱ्या पत्नी नंदा हिच्या पासून असलेल्या दोन मुलींच्या जन्म दाखल्यावर नावाबाबत भिन्नता असली तरी पत्नी म्हणून नंदा हे नाव दोन्ही दाखल्यावर नमूद आहे. त्यामुळे रवि भोयर यांनी नामनिर्देशन अर्जात केवळ दोन अपत्य दाखवले आहे ते चुकीचे व शासन प्रशासनाची दिशाभूल आणि फसवणूक करणारी बाब आहे हे स्पष्ट होत आहे त्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी वामन काळे यांनी केली आहे.

 

सरपंचांनी बालक मंदिरच्या जागेवर केले अतिक्रमण ?

 

येन्सा गावात जुनी जागा ज्या नकाशात बालक मंदिर (1200 वर्ग फूट) म्हणून नमूद आहे त्या सरकारी जागेवर रवि भोयर यांनी अतिक्रमण करून तिथे घर बांधले आहे. त्या जागेवर त्यांचे आजोबा विठू रामा आसुटकर (मुत्य) यांनी सुद्धा तिथे अतिक्रमण केले होते. दरम्यान भोयर यांनी सरपंच पदाचा दुरुपयोग करून ती जागा स्वतःच्या नावाने ग्रामपंचायत रेकॉर्ड वर घेतली आहे, व त्यांनी त्या जागेजवळून जाणाऱ्या तीस फूट रस्त्यांची जागा कमी करून रस्ता अरुंद केला आहे सोबतच त्यांनी स्वतःचे भंगार रस्त्यांवर ठेऊन गावातील नागरिकांच्या येण्याजाण्याच्या मार्गाला अडथळा निर्माण केला आहे. एकूणच बेकायदेशीर सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण व नामनिर्देश अर्जात नमूद केलेले दोन अपत्य व प्रत्यक्षात असलेल्या तीन अपत्यांचे जन्म दाखल्याचे पुरावे याची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचे सरपंच पद ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी वामन दादा काळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली असल्याने रवि भोयर यांच्यावर सरपंच पद जाण्याची नामुष्की ओढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.