चंद्रपूर जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आ. मुनगंटीवार यांनी पोलीस महासंचालक श्री सेठ यांच्याशी चर्चा

144

चंद्रपूर जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आ. मुनगंटीवार यांनी पोलीस महासंचालक श्री सेठ यांच्याशी चर्चा

प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार : पोलीस महासंचालकांचे आश्वासन

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.05 मार्च 2022

सविस्तर बातमी:- विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी 4 मार्च रोजी  राजधानीत पोलीस महासंचालक श्री रजनीश सेठ यांची भेट घेतली . त्यांच्या पोलीस महासंचालक पदाच्या यशस्वी  कार्यकाळासाठी आ. मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या.

चंद्रपूर जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थे बाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस महासंचालक श्री सेठ यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यात माफिया राज निर्माण झाले असून खून , दरोडे , वाळू तस्करी अशा घटना सातत्याने घडत आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिक असुरक्षित असून यावर आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार या चर्चेदरम्यान म्हणाले.

यासंदर्भात आपण स्वतः जातीने लक्ष घालून आढावा घेऊ व गुन्हेगारी वर आळा घालण्यासाठी उपाययोजना करू असे आश्वासन पोलीस महासंचालक श्री सेठ यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले.