शहरातील चार मटका अड्ड्यावर पोलिसांचे छापे चौदा जणांना घेतले ताब्यात, अवधुतवाडी पोलिसांची कारवाई.

128

शहरातील चार मटका अड्ड्यावर पोलिसांचे छापे

चौदा जणांना घेतले ताब्यात, अवधुतवाडी पोलिसांची कारवाई.

यवतमाळ/महाराष्ट्र

प्रतिनिधी । यवतमाळ: शुभम जयस्वाल

सविस्तर बातमी:- शहरातील वेगवेगळ्या चार ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर अवधुतवाडी पोलिसांनी छापे टाकत १४ जणांना ताब्यात घेतले. या कारवाया गुरूवार, दि. ८ डिसेंबरला दुपारच्या सुमारास लोहारा, रेल्वेस्टेशन, शारदा चौक आणि सिंघानिया नगर परीसरात करण्यात आल्या.

सागर माहुरे, रोशन थोरात, धनराज मडावी, योगेश जाधव, सुरेस मसराम, संजु यादव, राजकुमार श्रीवास, सुभाष कैथवास, भारत सोळंकी, अनिल कासारे, संतोष गुप्ता, अब्दुल निसार अब्दुल रउफ, गणेश सोळंकी, आणि शाम नगराळे, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौदा जणांची नावे आहे. या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील लोहारा, रेल्वेस्टेशन, शारदा चौक आणि सिंघानिया नगर परीसरात मोठ्या प्रमाणात छुप्या पध्दतीने मटका अड्डे सुरू होते. याबाबतच गोपनीय माहिती अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांना मिळाली. त्यावरून पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एक पथकाने एकाच दिवशी त्या चारही ठिकाणी छापेमारी करीत तब्बल १४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.  ही कारवाई  जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनोज केदारे, पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक नागेश खाडे, पथकातील गजानन वाटमोडे, संजीव राठोड, अतुल इंगळे, चक्षुराज इंगोले, समाधान कांबळे, धनंजय पोटपल्लीवार, प्रशांत राठोड, सागर चिरडे, बबलु पठाण, कुणाल पांडे आणि रवि शेडमाके यांनी पार पाडली.