पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या श्रीक्षेत्र केदारनाथ येथील कार्यक्रमाचे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात थेट प्रक्षेपण संपन्न

88

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या श्रीक्षेत्र केदारनाथ येथील कार्यक्रमाचे

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात थेट प्रक्षेपण संपन्न

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.05 नवंबर 2021

  
सविस्तार बातमी :- शुक्रवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी दरम्यान दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी श्रीक्षेत्र केदारनाथ येथे श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या समाधी व मूर्तिचे अनावरण केले. तसेच केदारनाथ धाम येथे जवळपास 200 कोटीच्या विकासकामाचे उदघाटन तर 200 कोटी पेक्षा अधिक विकास कामांचे भूमिपूजन कोनशीला अनावरण केले. आद्य गुरु शंकराचार्यांनी देशभरातील ज्या तीर्थक्षेत्राना पदस्पर्श केला मठाची स्थापना केली तसेच 12 ज्योतीर्लिंग अशा देशभरातील एकूण 82 तीर्थक्षेत्री हा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला. सर्वच ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले त्याअनुषंगाने घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी चंद्रपूर भाजपाचे  जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,* भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे विनोद चौधरी, सुरेंद्र जोगी, भारत साळवे, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, हेमंत पाझारे, जितू टिपले सोबत शेकडो नागरिकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट प्रक्षेपणा द्वारे संबोधन ऐकले.