किटाळी फाटा ते चिंचोली पर्यंत रस्त्याचे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे

207

किटाळी फाटा ते चिंचोली पर्यंत रस्त्याचे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे

चन्द्रपुर/महाराष्ट्र

दिनांक 12 जुलै तालुका प्रतिनिधी

सविस्तर बातमी:-  किटली फाटा ते चिंचोली पर्यत त्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्या परिसरातील लोकांना येजा करायला खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे या रस्त्याने या रस्त्याच्या खड्ड्यामुळे आजपर्यंत भरपूर अपघात झालीत आणि समोरची शक्यता नाकारता येत नाही. सद्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे या परिसरातील लोकांना जास्त त्रास सहन करावा लागतो आहे, त्यामुळे परिसरातील भटाळी, किटाळी, पायली, चिंचोली या गावातील नागरिकांना येजा करताना खूप त्रास सहन करावा लागतो.

 

लवकरात लवकर या रस्त्याचे खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असं निवेदन सामाजिक कार्यकर्ते सचिन उपरे आणि जतिन मत्ते यांनी कार्यालयात दिल. निवेदन उपअभियंता बांधकाम विभाग यांना निवेदन सादर करण्यात आले, त्याअनुषंगाने

सदर विषयाच्या अनुषंगाने उपअभियंता बांधकाम विभाग यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.