माझ्या विरोधात तक्रार का दिली म्हणून भर चौकात जोड्याने मारहाण, युवकाचा दारूच्या नशेत पुन्हा महिलेवर हल्ला

499

युवकाचा दारूच्या नशेत महिलेवर हल्ला

माझ्या विरोधात तक्रार का दिली म्हणून भर चौकात जोड्याने मारहाण…!

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 6 जुलाई 2021
रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता
संविस्तर बातमी घुग्घुस :- सोमवार 5 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता दरम्यान घुग्घुस येथील अमराई वार्डात राहणारी महिला कविता पद्मभूषण सरोदे वय 30 वर्षे यांच्या वर वार्डातीलच सुरज पाझारे याने तिच्या डोक्यावर काठीने मारून जखमी केले.

त्यामुळे महिलेने घुग्घुस पोलीस स्टेशन तक्रार दिली तक्रारी वरून घुग्घुस पोलिसांनी कलम 324,504,506 गुन्हा दाखल केला आहे.

दुपारी दरम्यान फिर्यादी महिलेच्या घरासमोर सुरज पाझारे हा दारू पिऊन घरासमोर शिवीगाळ करू लागला महिलेने हटकले असता सुरज पाझारे याने काठीने डोक्यावर वार केला. आज 6जुलै ला सकाळी कविता ह्या दुकानात दूध आणायला गेले असता त्यांना सूरज ने अडवीत माझ्या विरोधात तक्रार का दिली म्हणून भर चौकात जोड्याने मारहाण केली कविता पळू नये यासाठी त्यांच्या अंगावरील कपड्याची ओढताण सूरज ने केली, कविता यांच्या हाताला मार लागल्याने रक्ताच्या धारा निघत होत्या,त्यांनी त्याच अवस्थेत पोलीस स्टेशन ला जाऊन तक्रार दाखल केली 323, भा, द, वी, पुन्हा दाखल करण्यात आली, पुढीत तपास सुरु आहे,