ACC कंपनीचा विरोधात BRSP चे बेमुदत धरना आदोलनाला मिळाला यश

897

ACC कंपनीचा विरोधात BRSP चे बेमुदत धरना आदोलनाला मिळाला यश

चन्द्रपुर/महाराष्ट्र

दि, 19 जुन 2021

रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

 सविस्तर बातमी घुग्घुस:- आज दिनांक 18 जुन 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस च्या माध्यमातून BRSP संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड सुरेश माने सर यांचा मार्गदर्शनाखाली व BRSP जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन ACC चांदा सीमेंट कंपनी नकोडा या कंपनीचा विरोधात कामगारांच्या PF चोरी व अन्य मागण्यांसाठी दि. 5 जुन 2021 रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाला 14 व्या दिवशी यश मिळाले आहे. ACC कंपनीतील श्री तिरुपती कंस्ट्रक्शन ठेकेदार नितीन शर्मा या ठेकेदाराने गेल्या दहा वर्षांपासून 190 कामगार न्यू पॅकिंग हाऊस यांच्या 2011 पासून तर मेंटेनन्स येथील 13 कामगार 2016 पासुन तर आजपर्यंत PF बरोबर भरला नव्हता म्हणजे चोरी केला. हे जेव्हा कामगारांना माहिती झाल कि आपला ठेकेदार हा आपला PF बरोबर भरत नाही आहे. तर कामगारांने धावपळ करण्यास सुरुवात केली. पण सर्वि कडे निराशा मिळाल्याने नंतर BRSP जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांना या ACC कंपनीतील ठेकेदारा विषयी माहिती दिली कि दहा वर्षापासून PF चोरी करत आहे. तसेच जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी ACC कंपनीला व शासनाला निवेदन देण्यात आली दि 5 जुन 2021 रोजी बेमुदत धरना आंदोलन उभारले व 14 व्या दिवशी BRSP चा आंदोलनाला यश आले ह्या आंदोलनाची बैठक हे पोलीस स्टेशन घुग्घुस येथे घेण्यात आली या ठाणेदार साहेब मा. राहुलजी गांगुर्डे सर BRSP जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव ACC कंपनीतील मॅनेजमेंट मधील पुष्कर चौधरी साहेब व अभिजित साहेब व कामगार दत्ता वाघमारे ईश्वर बेले अशोक आसमपल्लीवार उपस्थित होते या बैठकीत या मिटिंग चे मिनिटस मध्ये लिहून घेण्यात आली. PF हा 31 जुलै चा आत भरणा केला जाईल 7 ते 10 तारखेचा आत पगार करण्यात येईल सर्वांना 23 ते 24 या पेक्षा जास्त काम मिळेल सर्वांना ESIC कार्ड मिळेल आणि ज्या नऊ कामगारांना निलंबित केले त्या नऊ कामगारांना परत कामावर रुजू केले जाईल या जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी मॅनेजमेंट सोबत लिहून घेतेवेळी स्पष्ट सांगितले जो पर्यन्त कामगार कामावर रुजू केले तेव्हाच आंदोलन समाप्त करणार अन्यथा आम्ही आमरण उपोषण करणार असा देखील इशारा देण्यात आला होता. 14 दिवस आंदोलनानंतर यश बघुन सर्व कामगारांचा चेहरावरती हास्य उमटून आले व संस्थापक अध्यक्ष राजु भाऊ झोडे उलगुलान कामगार संघटनेचे अस्थायी कामगार युनियन बनवुन आता ACC कंपनी मध्ये कामगारांची युनियन राहिल असे जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सांगितले कामगारांनी एक मेकाना अभिनंदन केले यावेळेस कामगार

ईश्वर बेले सचिव माहुरे शरद पाईकराव दत्ता वाघमारे इरफान पठाण दिपक दिप सदानंद ढोरके समाधान गायकवाड जगदीश मारबते राकेश पारशिवे अशोक भगत अशोक आसमपल्लीवार आदित्य सिंह रमाबाई सातारडे भाग्यश्रीताई भगत मायाताई सांड्रावार जोशनाताई डांगे सफि आलम राहुल काळे हरिदास मोहजे प्रविण भोयर राहुल खाडे विशाल जनजरला रोशन नळे व समस्त ACC कामगार BRSP टिम उपस्थित होते थे