कारले तुपात तळा, साखरेत घोळा कारले कडू ते कडूचं !

56

कारले तुपात तळा, साखरेत घोळा कारले कडू ते कडूचं !

या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कांग्रेसवर कडाडून टीका केला

 

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि . 08 अप्रैल 2024
रिपोर्ट :- अनुप यादव, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सविस्तर बातमी :- कारले तुपात तळा, साखरेत घोळा कारले कडू ते कडूचं ! या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कांग्रेसवर कडाडून टीका करीत चंद्रपुर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन केले. उद्या गुढीपाडवा, मराठी नववर्षानिमित्त त्यांनी मराठीत नववर्षाच्या शुभेच्छा देऊन उपस्थितांची मने जिंकली. आज चंद्रपूर येथील मोरवा येथे चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार व गडचिरोली चे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी ते आले होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, शोभाताई फडणवीस सह पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

____________________________________________
और न्यूज पढ़ें 👇👇👇

चांगले खाते म्हणजे काय?  शंका नको, मी प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करेल.!_

__________________________________________

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लाखो जनसमुदाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी यावेळी उपस्थित होता. नरेंद्र मोदी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची प्रशंसा करीत मुनगंटीवार यांना विजयी करून केंद्रात भाजप सरकार मजबूत करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. महत्वाचे म्हणजे दहा वर्षांनी नरेंद्र मोदी यांची सभा चंद्रपूरात सभा झाली. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीची महाराष्ट्रातील प्रचारसभा असल्यामुळे या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते.