ठेकेदाराकडून एसीसी कंपनीची मोठी फसवणूक ?

51
खळबळजनक 🛠🔧🔧🔧
ठेकेदाराकडून एसीसी कंपनीची मोठी फसवणूक ?
चंद्रपुर/महाराष्ट्र
दि.02 Nov 2023
रिपोर्ट : रमाकांत यादव जिला संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मजुरांचा पगार एसीसीचा आणि काम रेल्वेचे…….
एसीसी कंपनीच्या एका कंत्राटदाराचे कामगार तीन महिन्यापासून हजेरी लावून बाहेर ठिकाणी कामावर
सविस्तर बातमी चंद्रपुर
सिमेंटनगरच्या एसीसी कंपनीत चोरीच्या घटना सतत घडत असतात. सिमेंट व बेड मटेरियल चोरी प्रकरण ताजे असताना सिव्हिल इंजिनिअरच्या मदतीने केलेला लाखों रुपयांचा सनसनीखेज घोटाळा समोर आला आहे.
एका कंत्राटदाराचे अनेक वर्षापासून ACC मध्ये काम सूरू आहे तसेच त्या कंत्राटदाराचे वेकोलिच्या जागेवर रेल्वे रूट टाकण्याच्या ठिकाणी काम सुरु आहे.
मागील दोन ते तीन महिन्यापासून एसीसी कंपनीतील एका कंत्राटदाराने आपले कामगार शंकर उरकुडे,  संतोष सुणानी व सुपरवायजर अंजुमन, मारोती तसेच 10 अधिक कामगार यांना कंपनीत हजेरी लावून नकोडा जुनी पाणी टाकी जवळ रेल्वे रूट टाकण्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणच्या कामावर पाठविले.
हि बाबा लक्षात येताच सोमवारला एसीसी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी वेकोलिच्या रेल्वे रुटाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन त्या कंत्राटदाराच्या दोन सुपरवायजर व दोन कामगारांना त्या ठिकाणी काम करतांना रंगेहाथ पकडले व कंपनीच्या गेट जवळ आणले तेव्हा तिथे अनेक कामगार उपस्थित होते. कामगारांसमोर या दोन सुपरवायजर व दोन कामगारांनी त्याठिकाणी काम करीत असल्याची कबुली दिली. बिंग फुटलेल्या व घाबरलेल्या ठेकेदाराने मोठी ऑफर ACC अधिकाऱ्याला देऊन ही बाब दाबली अशी चर्चा कामगार वर्गात रंगत आहे.
ठेकेदाराच्या लालचीपणामुळे कामगारांचा नाहक बळी जात आहे.  गेट वर एन्ट्रीची चौकशी केल्यास सत्य समोर येणार असे बोलल्या जात आहे.
या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी. अनेक चोरींसारखी ही चोरी सुद्धा ACC अधिकारी दाबून ठेवेल की काय अशी शंका उपस्थित केल्या जात आहे.