खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी घडविले माणुसकीचे दर्शन.

43

खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

स्वतःच्या वाहनाने जखमीला दाखल केले रुग्णालयात

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि. 04 अक्टूबर 2022

रिपोर्ट:- हनिफ शेख घुग्घुस, संवाददाता 

सविस्तर बातमी:-   खासदार बाळूभाऊ धानोरकर हे राजकारणातील आगळेवेगळे रसायन आहे. दिलेला शब्द पाडणारे, गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती गंभीर अवस्थेत पडलेला होता. रयतवारी येथील एक सार्वजनिक कार्यक्रम आटोपून या मार्गाने खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर येत होते. रस्त्याच्या कडेला व्यक्ती पडलेला बघून खासदार धानोरकर यांनी चालकाला वाहन थांबवण्यात सांगितले. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मदतीने त्या जखमीला स्वतःच्या वाहनाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. खासदारांनी दाखविलेल्या तत्परतेने एका जखमीचा जीव वाचन्यास मदत झाली.