बगड खिडकी ते अंचलेश्र्वर गेट व रामाळा तलाव येथे मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांचा “हेरिटेज वॉक”  

71

बगड खिडकी ते अंचलेश्र्वर गेट व रामाळा तलाव येथे मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांचा “हेरिटेज वॉक”  
”ईको-प्रो” चे बंडू धोतरे आणि सदस्यांसह केली पाहणी

चंन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.07 फरवरी 2022

चंद्रपूर, : मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी “इको प्रो” संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे व संस्थेचे सदस्य यांच्यासह बगड खिडकी ते अंचलेश्र्वर गेट व रामाळा तलाव येथे “हेरिटेज वॉक” करून चंद्रपूर शहरातील प्राचीन वारसास्थळांची सद्यस्थिती व स्वच्छतेच्या कामाची  पाहणी केली.

रविवार, दि. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८ वाजता सदर वारसा स्थळांची निगा व संवर्धनाकरीता पुढील नियोजन व त्या अनुषंगाने तयारी व उपाययोजनांचा यावेळी आयुक्त विपीन पालीवाल यांनी आढावा घेतला. तसेच “इको-प्रो” चे अध्यक्ष बंडू धोतरे व अन्य सदस्यांशी साधकबाधक चर्चा केली.शहरातील पर्यावरण रक्षणासंबंधी “इको-प्रो” तर्फे करण्यात येणारी जनजागृती व विविध अभियान आणि भविष्यातील उपक्रमांची माहिती घेतली. तसेच सदर उपक्रमांमध्ये महापालिकेचा सहभाग व नागरिकांच्या सहकार्याने चंद्रपूर शहराच्या पर्यावरण रक्षणासाठी कार्य करण्यावर देखील चर्चा झाली.