जिल्ह्यात तीन जणांवर प्राणघातक हल्ले…! यवतमाळ, उमरखेड, मारेगावातील घटना, हल्लेखोरांवर गुन्हे नोंद.

89

जिल्ह्यात तीन जणांवर प्राणघातक हल्ले…!
यवतमाळ, उमरखेड, मारेगावातील घटना, हल्लेखोरांवर गुन्हे नोंद

प्रतिनिधी । यवतमाळ: शुभम जयस्वाल

दि. 13 दिसंबर 2021

सविस्तार घटना:-   क्षुल्लक कारणावरून झालेल्या वेगवेगळ्या तीन प्राणघातक हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले. यातील एक घटना यवतमाळ शहरातील कळंब चौक ते कुंभारपुरा मार्गावर घडली असून उर्वरीत दोन घटना उमरखेड आणि मारेगाव परिसरात घडल्या आहे. राजाभैय्या बघेल वय १९ वर्ष रा. यवतमाळ, संतोष लांबटिळे वय ३७ वर्ष रा. विडूळ उमरखेड आणि लक्ष्मी भाऊराव टेकाम वय ४५ वर्ष रा. कुंभा ता. मारेगाव अशी जखमींची नावे आहे.
या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील १९ वर्षीय तरूण राजाभैय्या बघेल हा हातगाडीवर पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तो कळंब चौक ते कुंभारपूरा मार्गाने पाणीपुरी विक्री करीत होता. यावेळी पाणीपुरी खाल्याच्या पैसे देण्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय व्यक्तीने चाकुने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात त्या व्यक्तीवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
तर उमरखेड तालुक्यातील विडुळ येथे दोघांनी काही कारण नसतांना संतोष लांबटिळे यांच्यासोबत वाद करीत शिविगाळ केली. त्यानंतर लाकडी राफ्टरने डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. या प्रकरणी संतोष लांबटिळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी पुजाराम कांबळे आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे.  तसेच मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील महिला लक्ष्मी टेकाम हीला गावातील निलेश ढाकणे याने दारू पिण्याकरीता पैसे मागितले होते. यावेळी त्या महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याले ढाकणे याने जातीवाचक शिविगाळ करीत लाकडी उभारीने महिलेच्या डोक्यावर, तोंडावर मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे.