जंगल परिसरात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड तिघांना घेतले ताब्यात, दोन लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

82

जंगल परिसरात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

तिघांना घेतले ताब्यात, दोन लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी । वणी:- शुभम जयस्वाल

सविस्त बातमी:– बाजारावर पोलिसांनी धाड टाकून कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी लावणाऱ्या तिघांना अटक केली. ही कारवाई तालुक्यातील मोहर्ली ते विरकुंडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जंगल भागात रविवारी करण्यात आली असून या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. जगदीश गुरुचरण पाटील वय ३८ वर्ष रा. राजूर कॉलरी, विठ्ठल लटारी पिंपळशेंडे वय ५८ वर्ष रा. नायगांव आणि विजय मधुकर फटाले वय ३८ वर्ष रा. पटवारी कॉलनी लालगुडा अशी त्या तिघांची नावे आहे.
वणी तालुक्यातील मोहर्ली ते विरकुंड मार्गावरील जंगल परिसरात कोंबड बाजार भरविला जात असल्याची गोपनीय माहिती वणी पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी कुणाला जराही सुगावा न लागू देता जंगल परिसरात जाऊन शोध घेतला असता, त्याठिकाणी काही इसम कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगार खेळतांना आढळून आले. कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा खेळ खेळणाऱ्या तिन आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्या जवळून झुंज लावणारे दोन कोंबडे व दोन लोखंडी धारदार काती पोलिसांनी जप्त केल्या. घटनास्थळावरून तीन दुचाक्या, तीन मोबाईल हँडसेट व जुगार खेळ्णाऱ्यांजवळ असलेली २ हजार २८० रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ३३ हजार ७८० रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी जगदीश पाटील, विठ्ठल पिंपळशेंडे आणि विजय फटाले आदींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या आदेशावरून पोलिस उपनिरिक्षक शिवाजी टिपूर्णे, परि पोलिस उपनिरिक्षक आशिष झिमटे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरिन्द्रकुमार भारती, विशाल गेडाम, शंकर चौधरी, अमोल नुनेलवार यांनी पार पाडली.