WCL ठेकेदारी कामगारांना HPC निर्धारित वेतन द्या : काँग्रेसची मागणी 01 ऑक्टोबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे बैठक

84

WCL ठेकेदारी कामगारांना HPC निर्धारित वेतन द्या : काँग्रेसची मागणी

01 ऑक्टोबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे बैठक

घुग्घुस : वेकोली अंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांवर वेकोली अधिकारी व ठेकेदारांच्या मिली भगत मूळे अनेक वर्षांपासून शोषण करीत आहे.

वेकोलीत ठेकेदारी कामगारांच्या वेतना करिता स्पेशल व्हेज बोर्ड आहे .

हाय पॉवर कमेटी निर्धारित वेतन हे साडे सातशे ते हजार रुपये प्रति दिवस असून सब एरिया घुग्घुस अंतर्गत कार्यरत कोटेनका सॅम्पलिंग कामगारांना कुठल्या तरी अन्य क्षेत्राचे किमान वेतन जवळपास चार साडे चारशे रुपये देण्यात येते.
यासोबतच या कामगारांना अन्य कुठल्याही प्रकारची सुविधा देण्यात येत नाही.
कामगारांच्या कार्य श्रेणी नुसार वेतन न देता सरसकट एकच वेतन देण्यात येते.

या प्रकाराची माहिती कामगारांनी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांना दिली असता काँग्रेस नेत्यांनी तात्काळ केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त तसेच वेकोली मुख्य महाप्रबंधक यांच्याकडे तक्रार केली असून सदर तक्रारीची दखल घेत 01 ऑक्टोबर रोजी संयुक्त बैठक कामगार आयुक्त कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
येत्या बैठकीत तोडगा न निघाल्यास काँग्रेस तर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस तर्फे देण्यात आला आहे