अटल बिहारी वाजपेयी स्मृती क्रीडा संकुल, महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांनी केली संकुलाची पाहणी

223

महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांनी केली बाबूपेठ क्रीडा संकुलाची पाहणी

सविस्तर बातमी:- महाराष्ट्र/चंद्रपूर, ता. २३ : बाबूपेठ येथील अटल बिहारी वाजपेयी स्मृती क्रीडा संकुल येथे महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी महापालिका पदाधिकाऱ्यानी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.

 

पाहिणीदरम्यान उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेविका नीलम आक्केवार, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेवक स्वामी कनकम यांची उपस्थिती होती.

 

माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून बाबूपेठ येथील क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण करण्यात आले. परिसरातील तरुणवर्गाला क्रीडा क्षेत्रात रुची निर्माण व्हावी, यासाठी क्रीडांगण, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रैक, महिला आणि बालकांसाठी ग्रीनजिमची व्यवस्था निर्माण करून देण्यात आली. या सुविंधामुळे परिसरातील नागरिक येथे ये-जा करू लागले होते. मागील दीड वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या महामारीनंतर क्रीडा संकुल बंद ठेवण्यात होते. या दरम्यान क्रीडा संकुलात काही ठिकाणी तुटफूट झाली आहे. त्यांची तातडीने दुरुस्ती करून नूतनीकरण करण्याच्या सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिल्या आहेत. यावेळी महापालिका पदाधिकाऱ्यानी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून क्रीडा संकुलातील समस्या जाणून घेतल्या.