ACC कंपनीचा विरोधात दि. 5 जुन 2021 रोजी बेमुदत धरना आंदोलन सुरू सुरेश मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव BRSP

286

ACC कंपनीचा विरोधात दि. 5 जुन 2021 रोजी बेमुदत धरना आंदोलन सुरू
सुरेश मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव BRSP

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि.05 जुन 2021
रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता
पुरी खबर:-घुग्घुस/चंद्रपुर 05 जुन 2021 रोजी ACC चांदा सिमेंट कंपनी नकोडा चा विरुद्धात बेमुदत धरना आंदोलन सुरू करण्यात आले आतापर्यंत कामगारांच्या मागण्या साठी विनम्र पणे निवेदन देण्यात आले होते परंतु कंपनी कामगाराचा मागण्याची विषयी टाळाटाळ करण्याची भुमिका घेत असल्यामुळे नाईलाजाने ACC कंपनीचा विरोधात तीव्र भूमिका घेऊन बेमुदत धरना आंदोलन सुरू करण्यात आले हे आंदोलन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष BRSP मा. डॉ. अँड. सुरेश माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली व विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष मा. अँड. भुपेंद्र रायपुरे सर नेतृत्व जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या निदर्शनात करण्यात येत आहे * * ACC कंपनीतील ठेकेदार तिरुपती कंस्ट्रक्शन न्यु पॅकिंग प्लांट हा ठेकेदार या ठेकेदाराने सन 2011 पासून ACC कंपनीमध्ये न्यु पॅकिंग हाऊस प्लांट या साइड वर काम सुरू केले व या ठेकेदाराकडे 190 कामगार असुन हे फक्त सिमेंट लोडिंगचे काम करतात. या ठेकेदाराने सण 2011 ते 2014 पर्यंत 780 रुपये PF कपात करत असुन तो कामगारांच्या PF खात्यात फक्त 300 ते 400 रुपये भरणा करत होता. 2014 ते 2018 ला या ठेकेदाराने PF कपात मध्ये वाड करून 1,800 रुपये PF कपात करण्यात आला त्यातही हा ठेकेदार 400 ते 500 रुपये भरणा करत होता नंतर 2018 पासुन तर आजपर्यंत PF भरला देखील नाही व मेडिकल सुविधा नाही CLPL मिळत नाही ह्या समस्या ACC कंपनीतील कामगाराने विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष अँड भुपेंद्र रायपुरे सर व BRSP जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांना सांगितले BRSP तर्फे या विषयावर नम्रपणे निवेदन देण्यात आले BRSP च्या निवेदनाची दखल घेत ACC कंपनीला घाम फुटला व कामगारांचा 9 महिन्याचा PF भरण्यात आला. परंतु हे इथेच थांबले नाही नंतर आणखी एक PF चोरी केल्याची घटना उघडकीस आली ते म्हणजे त्याच ठेकेदाराची हे कामाची साईट मेकॅनिक मेंटेनन्स ची या साईटवर 13 कामगार काम करतात यांचा देखील या तिरुपती कंस्ट्रक्शन ठेकेदाराने 7 वर्षापासून PF भरलेला नाही असे घोटाळे लक्षात घेता कामगाराचा बाकी उरलेले काही वर्षांचा PF लोडिंग वर्कर्स व मेकॅनिक वर्कर्स चा सुद्धा PF लवकरात लवकर भरणा करावा असे आवाहन ACC कंपनीला जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी दिला. व या तिरुपती कंस्ट्रक्शन ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्याचा ठेका बंद करण्यात यावा. व कंपनीने कामगारांना फॅक्टरी एक्ट नुसार संपूर्ण सुविधा पुरविण्यात याव्या चोर ठेकेदार बंद करा असे नारे बाजी लावून धरली जने करून दुसर्‍या ठेकेदार हा अशा PF चोरी करणार नाही.

जोपर्यंत कामगारांच्या हक्काचा मागण्या पूर्ण होणार नाहीत किंवा कामगारांच्या मागण्या ACC कंपनीकडून लेखी स्वरूपात आम्हाला लिहून मिळणार नाही तो पर्यंत आम्ही बेमुदत धरना आंदोलन सोडणार नाही असे BRSP जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सांगितले कामगारांच्या हक्काचा मागण्यासाठी आम्ही सिमेंट रेल्वे रोको आंदोलन करणार ट्रक सिमेंट वाहतूक रोको आंदोलन करण्यात येईल ACC मध्ये गेट जाम सुध्दा आंदोलन करण्यात येईल जोपर्यंत कामगारांचा चोरी केलेला PF व प्रतीमाह 26 डय़ुटी, ओवर टाइम (OT), मेडिकल सुविधा, CL, PL, वार्षिक आठ PH, डब्बल (OT), व सर्व ठेकेदारी कामगारांना मीनीमम वेतन , किमान वेतन, व अन्य मागण्या पूर्ण करण्यात यावा असे जिल्हा महासचिव BRSP सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी सांगितले आंदोलनात सहभागी BRSP जिल्हा प्रभारी मा. संजय बोधे सर, जिल्हाध्यक्ष जेडी रामटेके, व ACC कामगार इश्वर बेले, दत्ता वाघमारे, अशोक आसमपल्लीवार, शरद पाईकराव, सचिन माहुरे,एकनाथ पाऊनकर, योगेश आसुटकर, दिपक दिप, हरिदास मोहजे,ए. जयाकर, एन. राजाबाबु, डि. नागेश, डि. जंपय्या, डि. वसंत, चंद्रशेखर पोडे, सदानंद ढोरके,समाधान गायकवाड, राकेश नवले, रोशन नळे, सफी आलम, राहुल खाडे, के श्रीनिवास ए. जयंत ए. जयाकर इरफान पठाण, एस के इस्राईल, प्रवीण भोयर, करण काळबांडे, जगदीश मारबते राकेश पारशिवे आदित्य सिंह सुमीत फुलकर अशोक भगत अरविंद चहांदे व समस्त BRSP ACC कामगार उपस्थित उपस्थित होते