घुग्घुस नगरपरिषदेत महीलाचा धडक मोर्चा

155

चन्द्रपुर/महाराष्ट्र

दि. 01 जुन 2021

रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

सविस्तर बातमी:- घुग्गुस येथील बहिरमबाबा नगर वार्ड क्रमांक 6 च्या महिलांनी नगर परिषेद कार्यालयात पाण्यासाठी धडक दिली व प्रशासना विरुद्ध संताप व्यक्त केला.

उन्हाळा सुरु असल्याने पाण्याची टंचाई भासत आहे.जुन्या पाण्याच्या टाकी मधून व्यवस्थित पाणी सुरु होते. परंतु ग्रामपंचायतनी पाण्याची पाईप लाईन बदलवून नवीन पाण्याच्या टाकीला जोडल्यामुळे बहिरमबाबा नगर येथे पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.नळ धारकांच्या नळाला पाणी कमी येत असल्यामुळे पाण्यासाठी येथील महिलांना वणवण भटकावे लागते.यासाठी येथील पाईप लाईन जुन्या पाण्याच्या टाकीला जोडून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे.यावेळी निवेदन देतांना सुशीला बरडे,शारदा भरणे, अंजली ठाकरे किरण रंगारी, नूतन पडवेकर, सुजाता रंगारी, रमाबाई पडवेकर, माधुरी भोंगळे, वंदना तिवारी, नीलिमा निचकोला, ममता रईदास, अनिल बोबडे, व मधुकर धांडे उपस्थित होते.