घुग्घुस नगरपरिषदे कडून नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई

255

घुगघुस नगरपरिषदे कडून नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई

चन्द्रपुर/महाराष्ट्र

 दि. 1 जुन 2021

रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

सविस्तर बातमी :-घुग्गुस येथे कोविड 19 नियमांचे पालन न करणाऱ्या आठवडी बाजार,गांधी चौक ते मालगुजारी तलाव पर्यंत असणाऱ्या रस्त्यावरील निरंजन नगराळे जनरल स्टोर्स (500 रू) हिना जनरल स्टोर (3000 रू) राजश्री बिकानेर (2000रू) नंदा क्लाथ स्टोर 1000रू, झाडे बर्तन भंडार 2000रू,अशा एकूण पाच विक्रेत्यांवर कारवाई नगर परिषेदेचे कर्मचारी यांनी 8500 हजाराचा दंड ठोठावला आहे.शहरात रोज पोलिसाची गस्ती असतानी शासनाच्या नियमानुसार जीवनावश्यक वस्तू सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा आदेश असताना हे व्यापारी दिवसभर विक्री करतात तर काही व्यापारी दुकाना समोर बसून राहतात ग्राहक आल्यावर दुकानाचे अर्ध्य शटर उघडून मालाची विक्री करतात यामुळे अशा दुकानदारावर सुद्धा कारवाई होणे आवश्यक आहे

दिनांक 1 जुनला नगर परिषेदेचे कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी  बाजारपेठेची पाहणी सुरु केली असता काही दुकानदार लाॅकडाउन  नियमांचे उल्लंघन करताना दिसताच नगर परिषेद प्रशासनाने दंड ठोठावला व वेळेवर दुकाने बंद ठेवण्याची आदेश  दिली.तरी कोरोना नियमाला न घाबरता सर्रास पणे विक्री करताना दिसून येत होते. ही कारवाई महसूल विभाग,नगरपरिषेदेचे कर्मचारी यांनी केली.