घुग्गुस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शिवजयंती प्रचंड उत्साहात साजरी

342

*रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आपण ताठ मानेने उभे – विवेक बोढे*

रिपोर्ट :- हनिफ शेख संवाददाता

चन्द्रपुर/घुग्घुस :- 19 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता घुग्गुस येथील *मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे याच्या मार्गदर्शनात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती राजे शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.*

यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा युवामोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले. राजे शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराजा मुळे आज आपण ताठ मानेने उभे आहोत. त्यांची प्रेरणा घेऊन समाज कार्य करीत आहोत. या पृथ्वीतलावर गोर गरीब रयतेचा राजा जर कोणी झाला असेल तर ते राजे शिवाजी महाराज होय. जनकल्याणावर आधारित मराठी साम्राज्य भारतभर पसरले पाहिजे ही संकल्पना घेऊन त्यांनी कार्य केले. सत्याचा विजय कितीही खडतर प्रवास असला तरी होतोच हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातून आपल्याला शिकता येते असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी जिप महिला व बालकल्याण सभापती नितु चौधरी, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, सिनू इसरप, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, युवा मोर्चाचे अमोल थेरे, भाजपा नेते संजय भोंगळे,बबलू सातपुते, निरंजन डंभारे,मुज्जू लोहाणी, प्रवीण सोदारी, शरद गेडाम,तुलसीदास ढवस, श्रीकांत सावे,प्रवेश सोदारी, नितीन कटारे, सुरेंद्र जोगी, विजय माथणकर, राजू भोंगळे, सुरेंद्र भोंगळे, विनोद जंजर्ला,पांडू थेरे, कोमल ठाकरे,मनमोहन महाकाली, विकास बारसागडे, प्रसाद मल्लारप, राजू चटकी, रवी बोबडे, अंकित करकाडे, शुभम डोंगे, शिवदास सदाफडे,राजू चौधरी, हेमंत कुमार, राजू बोंडे, घुग्गुस प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुचिता लुटे, वैशाली ढवस, पुष्पा रामटेके, सुरेखा डाखरे, अर्चना लेंडे,वंदना मुळेवार,नंदा चिमुरकर, ज्योती काळे,सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, प्रिया नागभीडकर उपस्थित होते.