कोल का झोल…. !! संगीता सेल्स चा कारनामा…. !! मध्यप्रदेश च्या जिंदल पॉवर ला मिलावट कोळश्याचा पुरवठा !!!

76

कोल का झोल…. !!

संगीता सेल्स चा कारनामा…. !!

मध्यप्रदेश च्या जिंदल पॉवर ला मिलावट कोळश्याचा पुरवठा !!!

चंद्रपूर (वि. प्रति. )

सविस्तर बातमी :- चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर जीओसीएम आणि निलजई येथील ओसीएम येथून मध्यप्रदेश च्या जिन्दल पॉवर ला उच्च दर्जाचा कोळश्याचा पुरवठा करण्याचे काम संगीता सेल्स या ट्रान्सपोर्ट कंपनीला मिळाले आहे. संगीता सेल्स कंपनीचे वणी व चंद्रपूरातील ताडाळी येथे स्वतःचे कोल डेपो आहेत. जिंदल पॉवर साठी निघालेला कोळसा खदानीतुन सरळ जिंदल पॉवर ला जायला हवा. परंतु तसे न होता हा कोळसा ताडाळी व वणी येथील संगीता सेल्स चा कोल डेपो मधुन मिलावट करून जिंदल पॉवर ला सप्लाय करण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू असुन जिंदल पॉवर साठी जाणारा उच्च दर्जाचा कोळसा खुल्या मार्केट मध्ये मोठ्या किंमतीमध्ये विकुन संगीता सेल्स करोडो ची माया जमा करीत आहे. विटा भट्टी व अन्य छोट्या उद्योगांच्या वापरात येणारा कोळश्याचा चुरा, काळी माती – रेती मिक्स करून त्यातुन माल कमाविण्याचा सुरू असलेल्या या धंद्यावर संबंधित विभागाने अंकुश आणावा अशी मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ४० हजार टन कोळश्याचा पुरवठा जिंदल पॉवर ला पोहोचविण्याचे काम संगीता सेल्स ला मिळाले असुन त्यातील १५ हजार टन मिलावट कोळसा संगीता सेल्स ने जिंदल पॉवर ला पोहोचविला असुन अजुन ३० हजार टन कोळशा पोहोचविण्याचे काम शिल्लक असुन या शिल्लक कोळश्यात मिलावट करण्यासाठी काळी माती-रेती, कोळश्याचा चुरा संगीता सेल्स च्या कोळसा डेपो वर जमा करण्यात आल्याचे अधिकृत वृत्त आहे. संगीता सेल्स चा ‘मामा’ या सगळ्या हेराफेरीचा सुत्रधार असल्याचे सांगण्यात येते. संगीता सेल्स च्या कोळसा डेपोवर नुकतीच पत्रकारांच्या शिष्टमंडळाने भेट देवून पाहणी केली असता सदर प्रकार ध्यानात आला असुन या प्रकाराची माहिती जिंदल पॉवर च्या सिएमडी पर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांचे शिष्टमंडळ करणार आहे. जिंदल पॉवर सोबत होत असलेली धोखाधडी लवकरच उजेडात आणण्यात येणार आहे.

कोळश्याचा खाणीमधुन निघालेला कोळश्यातुन लाखो ची माया जमविण्याचा गोरखधंदा अनेक वर्षापासून चंद्रपूर-वणी- यवतमाळ येथील कोळशा व्यापारी करीत आहे. यामधुन करोडो चा हेराफेरी या गोरखधंद्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी होणे गरजेचे आहे. कोळसा डेपो, रेल्वे सायडिंग वर जमा करून त्यानंतर त्यामध्ये मिलावट केली जाते. या कोलडेपो, रेल्वे सायडिंग वर प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही नियंत्रण नसते. यातील अनेक कोल डेपो ला परवानगी नाही, हा वेगळा मुद्दा असुन या कोल डेपो मधुन मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत असुन त्यातुन नागरीकांच्या आरोग्यावर याचा दुष्पपरिणाम होतो, याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जाते.