शाळा प्रशासन व व्यवस्थापन समिती तातडीच्या बैठकीत घेतला नविन वर्गखोल्यांचा निर्णय

75

📕 शाळा प्रशासन व व्यवस्थापन समिती बैठकीत घेतला वर्गखोलीचा निर्णय

📕 शिक्षणाधिकारी यांचे आले शाळेला दोन पाळीत शाळा घेण्याचे पत्र • मुलांचे शिक्षण होणार खंडीत

📡 साकोली / महाराष्ट्र
Sat. 22. 07. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी | साकोली : येथील इ.स. १८६० पूर्वी स्थापित सर्वात जूनी व मुख्य जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्रं ०१ च्या जीर्ण इमारतीच्या स्लॅबचे तुकडे कोसळणे आणि थोडक्यात विद्यार्थी बचावणे ही बाब मुंबई मंत्रालयाच्या दालनापर्यंत पोचली आहे. २१ जुलैला शिक्षणाधिकारी भंडारा यांनी धोकादायक स्थितीत ही शाळा दोन पाळीत भरविण्याचे पत्र दिले. याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये करीता शाळा प्रशासन व व्यवस्थापन समितीची शनि. ( २२ जुलै ) तातडीच्या बैठकीत यावर उपाययोजना करण्यात आली आणि दोन जीर्ण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या बांधकामासाठी अखेर पुढाकार घेतला.
📕 १० जुलैच्या शाळेतील जीर्ण इमारतीचा स्लॅब कॉक्रीट कोसळणे या अतिसंवेदनशील प्रकरणावर क्षेत्राचे आमदार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांकडे हा विषय गेला असून घटनेचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात का आले नाही.? १७ जुलैला शाळेत शिक्षण सभापती भंडारा रमेश पारधी, जि.प. समाजकल्याण सभापती मदन रामटेके व चमुंनी यांनी भेटही दिली. यावर शुक्रवार २१ जुलैला शिक्षणाधिकारी भंडारा रविंद्र सोनटक्के यांनी शाळेला पत्र दिले की धोकादायक स्थितीत व अतिवृष्टी पाहता येथील शाळा ही ०७:३० सकाळील शाळा व १०:३० – ०४:३० सायंकाळ अश्या दोन पाळीत शाळा भरविण्यात यावी. परंतू असे केले तर शालेय पोषण आहार शिजविणे, विद्यार्थी गुणवत्ता व शालेय शिक्षणाची तारांबळ उडत मुलांच्या शिक्षणात खंड पडेल. हाच गंभीर विषयाबाबद शनिवार २२ जुलैला शाळा प्रशासन व शाळा व्यवस्थापन समितीने अतितातडीची बैठक बोलवित शाळेतील पाहणी केली. यावर उपाययोजना म्हणजे येथील रंगमंच व शालेय पोषण आहार – संगणक कक्ष उपलब्ध असून त्याची स्थिती उत्तम आहे. रंगमंचावर १ वर्गखोली बांधकाम करून येथे वर्ग १ आणि २, संगणक कक्षात वर्ग ३ आणि ४ बसवून जीर्ण दोन वर्गखोल्यांत शालेय पोषण आहार साहित्य टाकणे कारण शालेय शिक्षणात खंड पडू नये व शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये करीता हा महत्त्वाचा निर्णय घेऊन सविस्तर बैठकीत शाळा व्यवस्थापन समिती व शाळा प्रशासन यांनी दोन पाळीत शाळा न भरविता पूर्वीप्रमाणेच शाळा भरविण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
📕 सदर तातडीच्या बैठकीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष रिना चचाने, से.नि. शिक्षक रेवाराम तिडके, सदस्यगण हेमंत भारद्वाज, आशिष चेडगे, अमित लांजेवार रामदास आगाशे, रवि भोंगाणे, अजय कावळे व मुख्याध्यापक डि. डी. वलथरे, बि. पी. राऊत, एम. व्ही. बोकडे, टि. आय. पटले, आर. आर. बांगरे, शालिनी राऊत, रेवंता बिसेन, कार्तिक साखरे आणि शालेय पोषण आहाराचे महिला सदस्य उपस्थित होते.

[ Do not 🚫 Copy this News on Global Maharashtra News Media ]