साकोलीची पुजा कुरंजेकर हिचा मुंबईत सत्कार

78

📕 साकोलीची पुजा कुरंजेकर हिचा मुंबईत सत्कार

📕 मीट चेअरपर्सन महासम्मेलन – २०२३ मुंबईत आयोजन

◾ साकोली / महाराष्ट्र
20. 07. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी •
साकोली : आयुर्विमा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत उतुंग शिखर गाठणारी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारतीय आयुर्विमेचे महत्त्व आणि कुटूंबांना लाभ पटवून देण्यासाठी शिबिरे आयोजित करणारी साकोली क्षेत्रातील पुजा कुरंजेकरचा भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे ईस्ट मुंबई विले पार्ले स्थित सहारा स्टार हॉटेल येथील आयोजित ( २० जुलै ) “मीट चेअरपर्सन महासम्मेलन – २०२३” या केंद्रस्तरीय कार्यक्रमात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे चेअरमन यांच्या हस्ते गौरव चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. या प्रशंसनीय कार्याने पुन्हा एकदा साकोलीची ओळख महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचल्याने साकोली क्षेत्रात पुजा कुरंजेकरचे तोंडभरून कौतुक केले जात आहे.

🔳 मुंबई येथे गुरुवार २० जुलैला आयोजित “मीट चेअरपर्सन महासम्मेलन – २०२३” या समारोहात देशातील १०० विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या २०४८ शाखा कार्यालयातून जवळपास ३००० (सी एल आय ए) अभिकर्त्यानी भाग घेतला. त्यामुळे विमा क्षेत्रात या महासम्मेलनाला विशेष महत्व प्राप्त झाले होते. या सत्कार कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान साकोली शाखेतील एकमेव महिला (सी. एल. आय.ए.) अभिकर्ता पुजा कुरंजेकर यांना मिळाला. पुजा कुरंजेकर साकोली शाखेतील पहिली महिला (सी. एल.आय.ए) अभिकर्ता आहे ज्यांचा सत्कार एल आय सी चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आला. ही भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या क्षेत्रात साकोली शाखेसाठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल साकोली भारतीय जीवन विमा क्षेत्रातील सर्व जनतेकडून व भारतीय आयुर्विमा महामंडळ नागपूर विभागातील पूजा कुरंजेकर हिच्या या कार्यकुशलतेवर नागपूर विभाग अंतर्गत साकोली क्षेत्राचे नाव महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचल्याने पुजा कुरंजेकर हिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.