साकोली महामार्गावर दररोज वाहतूक जाम : शहर काँग्रेस कमिटीचे निवेदन

47

🔳 साकोली महामार्गावर दररोज वाहतूक जाम : शहर काँग्रेसचे निवेदन

📕 दूर्घटना झाल्यास एजीआयपीएलला जबाबदार धरू – दिलीप मासूरकर यांचा इशारा

◾ साकोली / महाराष्ट्र
SUN. 23. 07. 2026
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी • साकोली : राष्ट्रीय महामार्ग जांभळी तेलीनाला ते भेल मूंडीपार पर्यंत सर्वीस रोडची व्यवस्था दुरुस्त करुन संभाव्ये मोठी दुर्घटना टाळण्या समंधी जिल्हाधिकारी यांना साकोली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप मासूरकर यांच्या नेतृत्वात निवेदन तहसीलदार साकोली मार्फत देण्यात आले. आणि तात्काळ उपाययोजना न झाल्यास व कोणतीही जीवितहानीचा प्रकार घडल्यास एजीआयपीएल कंपनीला जबाबदार धरु असा इशारा शहर काँग्रेस कमिटीने दिला आहे.
⏩ राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील जांभळी/स. ते भेल मुंडीपार/सडक येथे निर्मानाधीन उड्डाण पुलाच्या बांधकामात अनेक अनियमित्ता व भोंगळ कारभार असल्याने महामार्गावरील वाहतुक नेहमीच प्रभावित होत आहे. राष्ट्रीय प्राधिकरणाची दुर्लक्षित धोरणाचा फटका वाहतुकदारांना बसत आहे. उड्डाणपूल निर्माण कामात महामार्गावरील वाहतुकीसाठी सर्विस रोडची पर्यायी व्यवस्था गुणवत्ता पूर्ण न केल्याने दररोज वाहतुकीवर प्रभाव होत आहे. सर्वीस रोडवर मोठे खड्डे पडले आहे. उड्डाणपुलाच्या निर्माण कामात डष्ट व मातिचा वापर केल्याने सर्वीस रोड वर चिखल झालेला आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने सर्वीस रोडच्या कडेला चिकन मातिचा चिखल झाल्याने दुचाकी चालकांचा व मोठ्या वाहनांना अपघात होउन गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दररोज वाहतुक प्रभावित होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतात‌. आपातकालीन रुग्णाच्या रुग्णवाहिका सेवा तसेच अत्यावश्यक कामांसाठी जाणारे येणारे नागरिकांना, कर्मचारी व विद्यार्थ्यांना कमालीचा नाहक त्रास होत आहे.
हा संभाव्य धोका व येथे होणारी जिवितहानी टाळण्यासाठी व महामार्गा वरील वाहतुक सुरळित करण्यासाठी त्वरीत सर्वीसरोड ची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी साकोली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप मासूरकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात कुलदीप नंदेश्वर, विनायक देशमुख, डोंगरे, प्रमोद मडावी, विजय साखरे, दिलीप निनावे, सतिश रंगारी, कृष्णा हुकरे, विशाल गजभिये, दीपक थानथराटे, जयश्री भानारकर, माधुरी रासेकर, रेखा कुथे, भुमेश्वर निंबेकर, सुशील पुस्तोडे, सोनू बैरागी, सचिन राऊत, आकाश मेश्राम, रविंद्र पंचभाई, राजेश जुगनाके, राहुल राऊत, जयगोपल लंजे, शेखर कांबळे यांसह कांग्रेस चे बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

🔊 काय म्हणाले शहर अध्यक्ष • 
” दररोजच्या या वाहतुकीची कोंडी याला आवागमन करणारी जनता अत्यंत त्रासली आहे, या भयंकर प्रकरणी रात्रीबेरात्री कोणतीही जिवितहानी झाली तर याला कोण.? वारंवार समंधित कंपनीला सांगूनही जर ऐकत नसतील तर आम्हाला शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल व कुणलीही प्राणहानी झाली तर कंपनीलाच जबाबदार ठरवित त्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल ” – दिलीप मासूरकर • अध्यक्ष – शहर काँग्रेस कमिटी साकोली