शाळेच्या पहिल्याच दिवशी झाला शिक्षिकेंचा सेवानिवृत्त समारंभ

71

शाळेच्या पहिल्या दिवशी झाला शिक्षिकेंचा सेवानिवृत्त समारंभ

५८ व्या वर्षी केले ५८ झाडांचे वृक्षारोपण • साकोली जिल्हा परिषद हायस्कूल येथे आयोजन

साकोली / महाराष्ट्र
FRI. 30. 06. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी – साकोली : ३० जून शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथील उच्च श्रेणी शिक्षिका सौ. सिंधू आर. खोब्रागडे यांचा सेवापूर्ती सेवानिवृत्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. प्रसंगी सेवानिवृत्ती घेत वयाच्या ५८ व्या वर्षी तब्बल ५८ झाडे लावित एक आगळावेगळा उपक्रम हाती घेत या सेवानिवृत्ती कार्यक्रमात अनोखी मिसाल कायम केली आहे.
स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आयोजित सेवानिवृत्त सत्कार व विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमात मंचावर अध्यक्ष तहसिलदार निलेश कदम, जि.प. सभापती मदन रामटेके, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात, तालुका कृषी अधिकारी सागर ढवळे, प्राचार्य धर्मेंद्र कोचे, सत्कारमूर्ती सिंधू खोब्रागडे, राधेश्याम खोब्रागडे, प्रभाकर सपाटे, प्रदीप गोमासे, अशोक रंगारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिश लांजेवार, नितीन बावणकर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद हायस्कूल परीसरात यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका सौ. सिंधू आर. खोब्रागडे यांकडून जिल्हा परिषद हायस्कूल गेट ते हायस्कूल द्वार ८० मीटरवर दोन्ही बाजूंनी रांगेत ५८ सुशोभित झाडांची लागवड करण्यात आली. मंचावरील सर्व अतिथींनी शिक्षिका सौ. सिंधू आर. खोब्रागडे आणि पती राधेश्याम खोब्रागडे यांना शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. तसेच संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद कर्मचारी यांनीही जाहीर सत्कार करून हार्दिक आभार मानले. येथे सेवानिवृत्त शिक्षिका सौ. सिंधू आर. खोब्रागडे यांकडून हायस्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचेही आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिष खोब्रागडे, चिन्मय खोब्रागडे, अतकरी मैडम, राजेश राऊत, सुदाम हटवार, प्रकाश भुरे, चंद्रकांत वडीकार, सर्व शिक्षकवृंद कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. संचालन प्रतिभा पडोळे व मृणाली अहीर यांनी तर आभार चांदेवार आणि चव्हाण सर यांनी मानले.

* Warning ⚠️ Do not 🚫 Copy this Global Maharashtra News Media limked Type News.