साकोलीत नोकरी लावण्याचा गंडा..पिडीत तरूणाने सुसाईड नोट लिहीत केली घरी आत्महत्या

98

🛑 साकोलीत नोकरी लावण्याचा गंडा ; पिडीत तरूणाची चिठ्ठी लिहून घरी आत्महत्या

🛑 फोन पे नी पाठविले होते २५ हजार • वारंवार पैशाची मागणी • पोलीसांत घटनेची नोंद

साकोली / महाराष्ट्र
Date | 29. 06. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

🔳 सविस्तर बातमी – साकोली : नोकरी संदर्भात ऑनलाईनने फसलेल्या एका पिडीत तरूणाने सुसाईड नोट लिहीत घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ( ता. २९.जून.) च्या मध्यरात्री साकोली शहरातील तलाव वार्डात घडली असून साकोली पोलीस ठाणे येथे सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे. व तरूणाने आत्महत्या पूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलीसांनी तपासाकरीता घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.
मृतक अजय गोपाळराव उईके वय २९ असे तरूणाचे नाव असून तलाव वार्डातील सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी यांचा मुलगा आहे. दि. २४ जून २०२३ पासून अजय ऑनलाईननी नोकरीच्या शोधात होता. यातच एका ऑनलाईन नोकरी लावण्याच्या एका शिल्पा ( परीवर्तित नाव ) तरूणीसोबत याची एका सेंटरहुन आँनलाईन माहिती मिळाली. अजयला नोकरी लावण्यासाठी तरूणीने प्रथम २५ हजाराची मागणी केली, अजयने आँनलाईन पेमेंट केल्यावर मुलाखतीचा फोन येणार व नोकरी पक्की होणार असे करून अजयने आपल्या आईला पैशे मागून ते फोन पे नंबर वर त्यांना पेमेंट केले. त्यानंतर अजयला वारंवार फोनवर अजून काही पैशे भरावे लागणार नाहीतर तुम्हाला नोकरी लागणार नाही असा तगादा लावला. त्यातच अजयने इकडून तिकडून पैशे जमविण्यासाठी धावपळ सुरू होती असे त्यांच्या वडीलांनी सांगितले. हा सर्व आँनलाईन नोकरीच्या नावाखाली फसवणूकीचा खेळ सतत ४ दिवस चालला. मला नोकरी मिळणार म्हणून आनंदाने अजय उईके याने दि. २८ जूनला रात्री आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना घरी बोलावून गोडधोड जेवणाचा व पुजा विधीही कार्यक्रम पार पडला. २८ जूनच्या रात्री सदर आँनलाईन नोकरी कंपनीच्या सर्व एजंट यांचे फोन नंबर पूर्णतः बंद झालेले होते. अजयने वारंवार त्यांचेशी संपर्क साधला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यातच अजयला आता आपण फसलो व मी आईकडून आणि इतरांकडून उसणे पैशे घेऊन माझी फसवणूक झाली हे लक्षात येताच कशाप्रकारे फसवणूकीचे षडयंत्र त्यासोबत केले त्याची पूर्ण माहिती एका चिठ्ठीवर लिहीत गुरूवार २९ जूनच्या मध्यरात्री घरी त्याच्या रूममधे अखेर अजयने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली, सकाळी अजयला आईनी चहासाठी दार ठोठावले असता दिर्घकाळ उत्तर न आल्याने आता जाऊन बघितले तर अजय रुममध्ये सिलिंग पंख्याला लटकलेला दिसला व सुसाईड नोट बाजूला गादीवर होती असे अजयचे आईवडिलांनी सांगितले.
सदर घटनेचा मर्ग व नोंद पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली असून अजयचे शव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. सदर नोकरी लावण्यासाठी अनेक फसवणूकीचे षडयंत्र करणा-या आँनलाईन एजन्सी सोबत अनेक प्रकार घडले असतांनाच एक तरूण व होतकरू विद्यार्थ्यांने आँनलाईन नोकरी लावण्याच्या प्रकारात आपण फसलो म्हणून आपली जीवनयात्रा संपवली अशी घटना साकोलीत पहिलीच असून एक तरूण शिक्षित विद्यार्थी याला बळी पडून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्याने परीसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात यांच्या मार्गदर्शनात तपासी अधिकारी यांची चमु करीत आहे.

Warning Do not 🚫 Copy this Global Maharashtra News Media Network.