नागपूर विभागातून पहिल्या तीन अभिकर्त्यात साकोलीचा रोशन कापगते झळकला

22

🛑 नागपूर विभागातून पहिल्या तीन अभिकर्त्यात साकोलीचा रोशन कापगते झळकला

साकोली / महाराष्ट्र
SAT. 01. 07. 2023
रिपोर्ट – आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

⭕ सविस्तर बातमी | साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाने २३ जून २०२३ ला एक विमा योजना नुकतेच लांच केले ती म्हणजे धन वृद्धी योजना. ही एक सिंगल प्रीमियम पॉलिसी असल्यामुळे या पॉलिसीला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. ही पॉलिसी सर्वात प्रथम साकोली शाखेत टाकण्याचे महत्त्वपुर्ण कार्य पुजा कुरंजेकर (सी एल आय ए) समूहातील कुशल अभिकर्ता रोशन कापगते यांनी केले.
रोशन कापगते यांनी साकोली शाखेत धन वृद्धी विमा योजना सर्वात प्रथम केली. तसेच नागपूर विभागातील २६ शाखा कार्यालयातून पहिल्या तीन अभिकर्त्यामध्ये येण्याचा मान मिळविला आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक साकोली शाखेतील विमा क्षेत्रात होत आहे. रोशन कापगते यांनी ही धन वृद्धी पॉलिसी आनंदा ॲप ने २३ जून ला पाहाटे १२.३० वाजता पुर्ण केली आहे. ही पॉलिसी पुर्ण करण्यात सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी स्वतः एल आय सी कार्यालयातून अविरत सेवा देत ही पॉलिसी पुर्ण करण्यात रोशन कापगते यांना मदत केली. अभिकर्ता रोशन कापगते व सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार यांची नवीन धन वृद्धी पॉलिसी सर्वात प्रथम करण्याची जिद्द पाहता साकोली शाखेतील अभिकर्त्यानमध्ये नवीन पॉलिसी करण्याविषयी उत्साह निर्माण झाला आहे. २८ जून ला साकोली शाखेत सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या उपस्थीत सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे व सहायक शाखाधिकारी उमेश लिंगलवार यांनी रोशन कापगते यांचा पुष्गुच्छ देऊन सत्कार केला व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.