साकोलीत मेडीकल मालकाचा मुलीवर अतिप्रसंग

111

🛑 साकोलीत औषधी दुकान मालकाचा मुलीवर अतिप्रसंग

🛑 साकोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

📡 साकोली / महाराष्ट्र
WED – 28. 06. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

🔳 सविस्तर बातमी | साकोली : शहरातील सेंदूरवाफा येथे पिल्लारे कॉम्प्लेक्स स्थित असणाऱ्या समर्थ मेडिकलचे प्रोप्रायटर उमेश भांडारकर वय ४० यांने २३ वर्षीय अविवाहित मुलीवर अनेक वेळा अतिप्रसंग केल्याने मुलीच्या तक्रारीवरून साकोली पोलीस स्टेशनमध्ये मंगळवार दिनांक २७ जूनला कलम ३६७ ,२ एन, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे.
सेंदूरवाफ्यातील प्रगती कॉलनी चौक येथील पिल्लारे कॉम्प्लेक्समधील समर्थ मेडिकलचे प्रोप्रायटर उमेश भांडारकर यांनी १० फेब्रुवारी ते दोन एप्रिल ०२ एप्रिल दरम्यान मुलीवर चार वेळा अतिप्रसंग केला. मुलीला कारने घेऊन मोहघाटा जंगलात तसेच भंडारा येथील हॉटेलमध्ये तिच्यावर अतिप्रसंग केला यासोबतच मुलीचे व्हिडिओ व फोटो काढून ते फेसबुक वर टाकून तिला धमकी दिल्यामुळे मुलगी घाबरून त्याच्या जबरदस्तीला बळी पडत गेली परंतु नेहमीच्या त्रासाला व जबरदस्तीला कंटाळून तिने २७ जूनला साकोली पोलीस स्टेशनमध्ये उमेश भांडारकर यांनी केलेल्या अतिप्रसंगचा भंडाफोड केला साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांनी अत्यंत दक्षतेने या प्रकरणाची दखल घेत आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खोकले हे अधिक तपास करीत आहेत.

• This News Do not 🚫 Copy a Global Maharashtra News Media Network.