प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार संदेश आप्पा पालकर यांना प्रदान

59

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार संदेश आप्पा पालकर यांना प्रदान

भंडारा जिल्हा पत्रकार संघाकडून शुभेच्छांचा वर्षाव

भंडारा / महाराष्ट्र
24. 04. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : साकोली / रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचा २०२३ मधील चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार दिग्दर्शक व निर्माता संदेश आप्पा पालकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी माणगाव पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, युवा पदाधिकारी स्वप्निल साळवी, सुधाकर नारायण शिपूरकर स्कूलचे व्यवस्थापक राजेंद्र सुर्वे, माणगांव तालुका अध्यक्ष सचिन पवार, तालुका उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री, कार्याध्यक्ष संतोष मोरे, सचिव रवींद्र जाधव, सल्लागार ॲड. परेश जाधव, सचिव राजेश जाधव, विवेक काटोलकर, मदन पवार, अक्षय जाधव, बाजीराव गायकवाड, महिला तालुका अध्यक्षा मृणाली जाधव, मानसी महाडीक, शितल सानप, जुगाड्या चित्रपटातील कलाकार किशोर पाटील, सुरेंद्र हाडकर, दिवाकर तात्या, रमेश धूमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी माणगावचे पी. आय. राजेंद्र पाटील यांनी रामराज सारख्या ग्रामीण भागातील तरुण चित्रपट क्षेत्रात भरारी घेतो आणि प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ त्यांचा सन्मान करते ही रायगड जिल्ह्यातील कलाकारांना प्रेरणा देणारी बाब असून तुमच्या चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आम्ही सोबत राहू असे प्रतिपादन केले.

Read more news 👇👇👇


साकोलीत उमरी लवारी घाटांवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत महसुलवर पडतो दररोज वाळूंचा दरोडा



प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ कोणालाही पुरस्कार प्रदान करीत नसून जी व्यक्ती किंवा संस्था शुन्यातून विश्व निर्माण करते अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करते त्यापैकी एक रत्न म्हणजे जुगाड्या चित्रपटांचे निर्माते व कलाकार संदेश (अप्पा) पालकर आहेत असे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांनी गौरवोद्गार काढले. जुगाड्या चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी अप्पा पालकर यांना संकटाचा सामना करत त्यांनी संघर्षावर कशी मात केली याचा लेखाजोखा कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार यांनी मांडला. रायगड जिल्ह्यातील एक कलाकार चित्रपट क्षेत्रात नाव रोशन करीत असेल तर आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत असे ॲड परेश जाधव यांनी सांगितले. जुगाड्या चित्रपटाची कथा काय आहे? तो चित्रपट कसा उभा राहिला? त्यामागे अप्पा पालकर यांनी काय मेहनत घेतली याचा आढावा किशोर पाटील यांनी सांगितला. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांनी माझ्यासारख्या नविन निर्मात्याचा सन्मान करून माझ्यावर प्रेम व्यक्त केले आणि माझ्यावर उत्कृष्ट चित्रपट निर्मितीची जबाबदारी सोपवली ती मी यापूढे सार्थ करून दाखवेन, आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी असावे असे भावनिक आवाहन अप्पा पालकर यांनी केले.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व जुगाड्या चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.