भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिपवंदन पुजन व भव्य महाप्रसाद..

64

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिपवंदन पुजन व भव्य महाप्रसाद

आ. नाना पटोले यांची उपस्थिती • छत्रपती ग्रुप व मित्र परिवार साकोलीतर्फे आयोजन

साकोली / महाराष्ट्र
14.04.2023
रिपोर्ट • आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी • साकोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त शहरातील जूने पंचायत समिती महात्मा गांधी प्रतिमा समोर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. येथे प्रतिमेचे पूजन, दिपज्योत प्रज्वलन, धम्मवंदना आणि भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले.

 

Read more news 👇👇👇


आयुर्विमा क्षेत्रात पुजा कुरंजेकर समूहाची साकोली शाखेत उल्लेखनीय कामगिरी.


 

१४ एप्रिलला स. १० वा. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दिपपुजन व सामुदायिक धम्मवंदना घेण्यात आली. प्रसंगी तेथे भिमगीतांची संगितमय प्रस्तुतीही करण्यात आली. कार्यक्रमात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले येथे उपस्थित होत स्वंयहाताने महाप्रसादही वितरण केले. जूने पंचायत समिती या मुख्य व मध्यवर्ती साकोली परीसरात हजारोंच्या वर नागरीकांनी थंड ताक पेय व महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती ग्रुप मित्र परिवारातील ओमप्रकाश गायकवाड, उमेश भुरे, दिलीप मासुरकर, जितेंद्र मेश्राम, नंदू गेडाम, सुरेशसिंह बघेल, विनायक देशमुख, राज साखरे, नरेश गणविर, मोहन बोरकर, विजय दूबे, से.नि. अधिकारी ग्यानीराम गोबाडे, पिंटू परशुरामकर, विक्की राऊत, दिपक थानथराटे, पंकज वासनिक, रवि परशुरामकर, जावेद शेख, नरेंद्र वाडीभस्मे, रवि राऊत यांसह छत्रपती ग्रुपचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेत संपूर्ण आयोजनात यांचा सिंहाचा वाटा राहिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे कॉंग्रेस शहराध्यक्ष अश्विन नशिने, जि.प. सभापती मदन रामटेके, ज्येष्ठ नागरिक रूपचंद टेंभुर्णे, यांचीही उपस्थिती होती. येथे महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ. विशाखा मेश्राम, पुजा बघेल, माजी नगरसेवक रविंद्र परशुरामकर, माजी उपसभापती लखन बर्वे, माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते, हेमंत भारद्वाज, आशिष चेडगे, अमित डुंभरे, अनूज बर्वे, शुभम देशमुख, निकेश सयाम, आरव चेडगे, आदींनी महाप्रसाद वितरण कार्यात मोलाचे योगदान दिले.