कुंभली : श्री हनुमान मूर्तीची विटंबना प्रकरणी आता घेतली गावकऱ्यांनी “रास्ता रोको” ची संतापजनक भूमिका

55

कुंभली : श्री हनुमान मूर्तीची विटंबना प्रकरणी आता घेतली गावकऱ्यांनी “रास्ता रोको” ची संतापजनक भूमिका

पत्रकार परिषद घेत दिली प्रेस नोट्स

साकोली / महाराष्ट्र
दि. 13.04.2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी • साकोली : जवळील कुंभली येथे मागे शनिवार ( दि.०१.) रात्री ०२:३० च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला असणाऱ्या शौचालय समोर व कचराकुंडीच्या बाजूला चिचवा झाडाखाली श्री हनुमान मूर्तीची स्थापना करून गावात शांतता भंग करून विटंबना करण्याचा प्रयत्न केला. आता याबाबद संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट दि. १३/०४/२०२३ ला याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी साकोली येथील प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ कार्यालयात पत्रकार परिषद घेत कुंभली ग्रामवासीयांनी आता या प्रकरणात कारवाई न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.

Read more news 👇👇👇


श्री संत लहरीबाबा देवस्थान पावत्यांच्या गहाळप्रकरणी झाला भक्तांचा आता सोशल मिडीयातून संताप सुरू



सदर संतापजनक घटना शुक्रवार ०१ एप्रिल २०२३ च्या मध्यरात्रीची असून अज्ञात आरोपींविरुद्ध साकोली पोलीसांनी गुन्हा दाखल केला. याबाद दोषींवर काहीच कारवाई होत नसल्याने आता गावकऱ्यांनी संतापजनक भुमिका घेतली व आज दि. १३ ला. साकोली येथे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ कार्यालयात पत्रकार परिषद घेत प्रेस नोट दिली. यात मुद्दे १) बीट जमादार कुरूडकर यांकडे ०७/०४/२०२३ ला तक्रारदार व निवडक गावकऱ्यांचे घटनेबद्दल माहिती असलेले बयाण ओढविण्याण आले व काही श्री हनुमान मुर्ती स्थापनेच्या अनुषंगाने देणगी स्वरूपात सरपंच उमेद गोडसे यांनी गोळा केलेल्या ( हनुमान भक्त फॅन क्लब कुंभली महाल ) या नावाने देणगी पावती छापून नोव्हेंबर – डिसेंबर २०२२ गोळा केलेल्या पावती पुरावे व बयाण नोंदविले गेले तरी सुद्धा पोलीस कारवाई संथ का दिसून येत आहे. २) घटनेसंदर्भात प्रशासनाला माहितीची विचारणा केली असता पोलीस यंत्रणा उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. ३) दि. १२ एप्रिलला जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुद्धा गावकऱ्यांतर्फे घटनेबाबद निवेदन देण्यात आले. ४) या संतप्त प्रकरणी सर्व उडवाउडवी व असमाधानकारक कार्यवाहीमुळे घटनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होत नसल्यामुळे आम्ही ही पत्रकार परिषदेत माहिती देत आहोत. ५) कुंभली गावातील ग्रामवासी आक्रोशित असून गट पोलीस प्रशासन दोषींवर व या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर दि. १८/०४/२०२३ पर्यंत कार्यवाही होत नसेल तर दि. २० एप्रिल २०२४ ला संपूर्ण गावकरी व हिंदु समाजाच्या वतीने न्याय मिळविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल या दरम्यान अनुचित घटना घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही दिला आहे. पत्रकार परिषदेत सचिन भेंडारकर, सुभाष गि-हेपुंजे, कपिल भेंडारकर, टोनू उके, भोजराम भेंडारकर, कैलाश शिवणकर, निताराम भेंडारकर, श्री हनुमान समिती अध्यक्ष कुंभली हिरालाल ठाकरे, अरविंद भेंडारकर, प्रमोद भेंडारकर, सुधाकर खोटेले, ग्रामपंचायत सदस्य नितीन भेंडारकर, रवि भेंडारकर, सतिश हत्तीमारे, विजू मेंढे, तंटामुक्त समिती अध्यक्ष कुंभली अमोल रहिमतकर हे हजर होते.