श्री संत लहरीबाबा देवस्थान पावत्यांच्या गहाळप्रकरणी झाला भक्तांचा आता सोशल मिडीयातून संताप सुरू

64

श्री संत लहरीबाबा देवस्थान पावत्यांच्या गहाळप्रकरणी झाला भक्तांचा आता सोशल मिडीयातून संताप सुरू

धर्मदाय सहाआयुक्तांची दोषींवर कारवाईसाठी विलंब का.? भक्त जनतेनी व्यक्त केली यांची संशयास्पद भुमिकेतून “मैनेज” झाल्याची चर्चा • देवस्थानात पदाधिकारी विश्वस्तांची आता कागदपत्रे फाईलखोदो कार्य सुरू •

साकोली / महाराष्ट्र
दि : 13.04.2023
रिपोर्ट – आशिष चेडगे • ग्लोबल महाराष्ट्र न्यूज – संवाददाता

सविस्तर बातमी • साकोली : शहरातील आराध्य दैवत संत श्री लहरीबाबा मठ देवस्थानाच्या देणगी पावत्यांच्या महाघोटाळा प्रकरणी पूर्ण सविस्तर पावत्यांच्या क्रमांक आणि देणगीदार नावांसहित ” ग्लोबल महाराष्ट्र न्यूज” मिडीया व “दैनिक युवाराष्ट्र दर्शन” ने वृत्त प्रकाशित करताच अख्खं भक्तांसह जनताही जागृत झाली आणि सोशल मिडीयातून याबाबत संतापजनक प्रतिक्रिया सुरू असून धर्मदाय आयुक्तांनी यांची चौकशी केली असतांनाच मात्र यातील खरे घोटाळ्यांचा मुख्य सुत्रधार कोणकोण.? आणि एवढे धक्कादायक प्रकार घडूनही आयुक्तांकडून या फसवणूक गुन्ह्याप्रकरणी पारदर्शक चौकशीला दिर्घकाळ विलंब व कारवाई थंडबस्त्यात का.? असा संतापजनक सुर भक्तभाविक देणगीदार जनतेत निघत असून या सार्वजनिक धार्मिक संस्थेतील महाभ्रष्टाचार प्रकरणी “नो सेटींग” करीत अगदी पारदर्शकतेने चौकशी करण्याची मागणी समस्त साकोली सेंदूरवाफा शहरातील श्री लहरीबाबा भक्त जनतेने केली आहे.
या देवस्थान ट्रस्टमधील अनेक देणगी पावत्यांच्या गहाळप्रकरणी मठातील अध्यक्ष सचिव व विश्ववस्तांना दि. ०९/१२/२०२२ ला मा. धर्मदाय आयुक्त, अधिक्षक न्याय नोंदणी विभाग भंडारा यांनी पावती क्र. १७, १४, २० ची नोंद कैशबुकात घेतली नाही, तसेच पावती क्र. ०२, ०५, ०६ व सन २०१४ – १५ व २०१६ ची ही कैशबुक व लेजरबुक मधे नोंद घेतली नाही, यांनी पावत्याबुकांचे स्टॉक बुकही ठेवले नाही याचे ३० दिवसांचे आत पूर्ण स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश पत्र दिले. परंतू आज ४ महिने लोटूनही वरील पत्रावरून काय स्पष्टीकरण सादर केले.? खरंच त्या गहाळ पावत्यांच्या रेकार्डला आयुक्तांकडे नोंदी घेतलीत काय.? अशी चर्चा देणगीदार जनतेत साकोली सेंदूरवाफा येथे सुरू आहे. या गैरव्यवहार प्रकरणी संपूर्ण वर्तमान कार्यरत विश्वस्त मंडळच संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून हजारोंच्या वर भक्तभाविकांमधे संभ्रम निर्माण होतो आहे की धर्मदाय आयुक्तांकडे काही “मॅनेज सेटींग” मुळे तर हा धार्मिक संस्थेतील महाभ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना.?
अशी खमंग चर्चा साकोली सेंदूरवाफा शहरातील प्रत्येक चौकात सुरू आहे. कारण एक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार, माजी दोन आमदार, विश्व हिंदू परिषद दिवंगत अध्यक्ष, प्रतिष्ठित वैद्यकीय महोदय, नामांकीत गुप्ता मेडीकल, विर्शी पावती, श्री स्वामी कंत्राटदार अश्या अनेक लाखोंच्या वर देणगीची रेकॉर्ड नोंदच धर्मदाय आयुक्तांकडे नसल्याने आणि २०१ पासून पुढील क्रमांकांच्या सर्व पावत्यांच गायब होणे या प्रकरणाला आता वेगळीच संतापाची लाट उसळत चालली आहे. वरून आजपर्यंत या श्री संत लहरीबाबा मठ येथे एकुण किती धनाढ्यांकडून गुप्त दान संपत्ती आली याचा किती हिशोब.? हे पण गुप्तदान धर्मदाय आयुक्तांकडे किती रेकॉर्ड नोंद दाखविले की दाखविलेच नाही.? मठ देवस्थान दुकानाची चाळ महामार्गात ध्वस्त झाली ते एनएचए आय कडून दिलेले १२ लाखांची मठ लेझर बुक आणि धर्मदाय आयुक्त कार्यालय यांकडे केली आहे काय.? असेल तर दाखवावे.!

Read more news 👇👇👇


.. अखेर साकोलीचा पावती महाघोटाळा झाला सिध्द ; क्रं. ०००२०३ ची ११ हजारांची पावतीच आयुक्तांकडे रेकॉर्डला दर्ज नाही


असे अनेक संशयास्पद प्रश्नांचा भडीमार आज भक्त देणगीदार जनतेत उपस्थित होते आहे. आता या साकोलीतील आराध्य दैवत संत श्री लहरीबाबा मठ देवस्थानाच्या पावत्यांच्या घोळांमधील प्रकरणांवर सोशल मिडीयातून विविध स्तरांवर भक्तजनतेत संताप व्यक्त होत असून पवित्र श्रद्धास्थान देवस्थानाला मलिन केल्याप्रकरणी दुःख व्यक्त केले आणि यांवर उच्चस्तरीय चौकशी करण्यातच यावी अशी भक्त देणगीदार जनतेत मागणी केली आहे कारण आज प्रत्येकजण हे सर्व देणगी श्री संत लहरीबाबा यांच्या धार्मिक श्रद्धा आस्थांवर विश्वास ठेऊन गोरगरीबांनी, सामान्य जनतेनी व सर्व स्तरातील जनतेने दिलेली सार्वजनिक कार्यासाठी दिलेली सढळ हाताने मदत होय व यांची जो पर्यंत पारदर्शक चौकशी होऊन दोषींवर फौजदारी कारवाई होत नाही तोपर्यंत साकोली सेंदूरवाफासह तालुक्यातील भक्तगण देणगीदार जनता शांत बसणार नाही असा संतापजनक सुर आज शहरात व सोशल मिडीयातून व्यक्त होत आहे. व याबाबद प्रतिनिधीने श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गंगासागर गुप्ता यांचेशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

प्रतिक्रिया
“माझी नुकतेच १ महिना झाला सचिवपदी निवड झाली आहे. ४ दिवसांआधी पावत्या गहाळ व गैरव्यवहार प्रकरण चर्चेत आहे, प्रकरणी शहानिशा करण्यासाठी मी मागील १० वर्षीय रिकार्ड बघितला नाही, त्यात विश्वस्तांशी चर्चा करणे, रेकॉर्ड पाहणे, सदर गहाळ पावत्या कुठे आहेत यावर सर्वात जूने मठ व्यवस्थापक किशोर तिडके यांचेशी चर्चा करण्याला मला १५ ते २० दिवसांचा वेळ द्यावा. या आराध्य दैवत संत लहरीबाबा मठावर जो जनतेचा विश्वास आहे तो कायम ठेवावा, या पावत्यांच्या घोटाळा प्रकरणी सत्यता पडताळून काय प्रकरण जनतेसमोर आणने माझे कर्तव्य आहे. याची तपासणी सुरू असून सत्य स्थिती समोर येईल”
– नितीन मनोहरराव खेडीकर सचिव श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान ट्रस्ट साकोली