.. अखेर साकोलीचा पावती महाघोटाळा झाला सिध्द ; क्रं. ०००२०३ ची ११ हजारांची पावतीच आयुक्तांकडे रेकॉर्डला दर्ज नाही

165

.. अखेर साकोलीचा पावती महाघोटाळा झाला सिध्द ; क्रं. ०००२०३ ची ११ हजारांची पावतीच आयुक्तांकडे रेकॉर्डला दर्ज नाही

होणार आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग भंडारा कडून उच्चस्तरीय चौकशी ; २० – २५ लाखांचा पावती घोटाळा प्रकरणी दोषी होतील गजाआड

भाग : 2

साकोली / महाराष्ट्र
दि. 11.04.2023
रिपोर्ट : आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : साकोली : साकोलीचे आराध्य दैवत श्री संत लहरीबाबा मठ देवस्थानानात सन २०१० ते २०१४, २०१५, २०१६ व २०१७ या कालावधीत मठ देवस्थानानात पावत्यांच्या घोळांमधील वातावरण तापले असून धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारीही गेल्या असतानांच आज दि. ११ एप्रिलला ग्लोबल महाराष्ट्र न्यूज चमु व दैनिक युवाराष्ट्र दर्शन टिम स्वतः मा. धर्मदाय आयुक्त भंडारा येथे प्रत्यक्ष जात सत्यस्थिती जाणली तर संपूर्ण धक्कादायक प्रकारच समोर आला की ०२ एप्रिल २०१५ ला तत्कालीन अध्यक्ष अशोक गुप्ता यांची स्वाक्षरी असलेली पावती क्र. ०००२०३ हरिश्चंद्र प्रथमदास गोखले यांची ११ हजार १११ रू. देणगी दिल्याची पावती मा. धर्मदाय आयुक्तांकडे त्यांनी पूर्ण रिकॉर्ड चाळले असता सदर क्रं.च्या पावतीची जमा नोंदच नव्हती यावरून हा जनतेचा सढळ हाताने मदत दिलेल्या पैश्यात पावती क्र. २०१ पासून पुढील सर्व पावत्याच या महान महाशयांनी गहाळ करीत यामधे किती लाखांचा घोटाळा केला हे सत्य अखेर समोर आले आहे. यात जवळपास २५ ते ३० लाखांत पैश्यांचा गैरव्यवहार प्रकरणी आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग भंडारा हेच नियमाने उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी तसा नियमच असून लवकरच धार्मिक संस्थेला पावत्या गहाळ प्रकरणी काळीमा फासणारे महान व काही यात दोषी उद्योगपती लवकरच गजाआड होण्याच्या मार्गावर आहेत. या संतापजनक प्रकाराने साकोलीत हाहाकार माजला असून यात कोणकोणते मोठे मासे अडकतात यांकडे सर्व भक्तभाविक देणगीदार जनतेचे लक्ष विशेष करून लागलेले आहे.यात मठातील अध्यक्ष, सचिव व विश्ववस्तांना अधिक्षक – न्याय सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय भंडारा यांनी नुकतेच पत्र देत सर्व गैरव्यवहारात गहाळ करण्यात आलेल्या पावत्यांच्ये स्पष्टीकरण मागितले आहे. व याची चौकशीही झालेली आहे. या संतापजनक प्रकाराने शहरातील हजारोंच्या संख्येने श्री लहरीबाबांच्या भक्तांनी याविरोधात रोष प्रकट केला असून जागृत असलेले श्री संत लहरीबाबा यांच्या पवित्र देवस्थानच्या काही लबाडखोरांनी हे अपवित्र पाप करणा-यांना शासन तर सोडणार नाही पण आमचे श्रद्धास्थान असलेले श्री संत लहरीबाबा यांना कदापि सोडणार नसून यांच्या पापांचा घडा आता भरला असून हे पापी अत्यंत वाईट शिक्षा भोगणारच या भाषेत सर्वत्र शहरात चर्चा व संताप व्यक्त होत आहे.

Read more news 👇👇👇


श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष अशोक गुप्ता यांच्या कार्यकाळात लाखोंच्यावर गैरप्रकार चव्हाट्यावर


 


संत श्री लहरीबाबा मठात सन २०१६ पासून श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान जिर्णोद्धार बांधकामासाठी यांनी अनेक पावत्या छापल्या यात पावत्या बुकांतील पावती क्र. १७, १४ व २० क्रमांकांची नोंद कैशवहीत घेतलेली नाही, तसेच पावती क्र. ०२, ०५, ०६ व सन २०१४ – १५ व २०१६ ची ही कैशवही लेझरवर दाखल केली नाही. यांनी सर्वसाधारण नोटीस ठराव व पावत्याबुकांचे स्टॉक बुकही ठेवले नाही. यांचे संपूर्ण धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारींनूसार मा. अधिक्षक न्याय – सा. न्याय नोंदणी कार्यालय भंडारा यांनी दि. ०९/१२/२०२२ ला ट्रस्टला अध्यक्ष, सचिव व विश्ववस्तांना यांचा संपूर्ण पावत्यांचे स्पष्टीकरण पत्र देऊन मागितले होते. पण आज ११ एप्रिलला हाच संतापजनक खुलासा प्रेस मिडीयाने उघडकीस आणला की तत्कालीन अध्यक्ष अशोक गुप्ता यांच्या स्वाक्षरीची पावती क्र ०००२०३ दि. ०२/०४/२०१५ देणगीदार स्व. हरिश्चंद्र प्रथमदास गोखले या नावाने स्व. रवि गोखले यांनी आपल्या वडीलांच्या नावे ११ हजार १११ रूपयांची पावती फाडली होती परंतू सदर पावतीची नोंदणीच धर्मदाय आयुक्त कार्यालय भंडारा येथे रेकॉर्डला नाही याचेच तात्पर्य मंदिरात ती रक्कम आलीच नाहीत याचा अर्थ ही पावतीची रक्कम परस्पर गहाळ करण्यात आली. आणि अश्या एकुण १५३ पावत्या व त्यांची पूर्ण रक्कम गहाळ करण्यात आली. हा ऐवढा मोठा महाघोटाळा आता उघडकीस आला असून साकोलीचे जागृत देवस्थान श्री संत लहरीबाबा मठ या पवित्र देवस्थानात असा अपवित्र करण्यासाठी मुख्य मास्टरमाईंड सुत्रधारांनी काय काय रात्रीतून फिल्डींग लावली असून या संतापजनक प्रकरणी आता २५ – ३० लाखांचा पावती महाघोटाळा प्रकरणी मात्र यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग भंडारा हे चौकशी करू करून दोषींवर उच्चस्तरीय चौकशी करून काय कारवाई करून सर्व देणगीदार भक्तभाविकांना न्याय प्रदान करतील यांकडे आता साकोलीच नाही तर भंडारा जिल्ह्यातील भक्तभाविकांचे लक्ष लागलेले आहे हे उल्लेखनीय.