रामनवमी सणात निघाला पोलीसांचा कडक बंदोबस्त रूट मार्च

46

रामनवमी सणात निघाला पोलीसांचा कडक बंदोबस्त रूट मार्च ; शांतता भंग केल्यास तात्काळ अटक गुन्हा दाखल

आज राहिल चोख बंदोबस्त ; विशेष पोलीस ठेवणार शोभायात्रेवर तीक्ष्ण नजर

साकोली / महाराष्ट्र
30.03.2023
रिपोर्ट आशिष चेडगे • ग्लोबल महाराष्ट्र संवाददाता

सविस्तर बातमी : साकोली :- श्रीराम जन्मोत्सव सोहळा श्रीराम नवमी निमित्त साकोली शहरात आज निघणा-या भव्य दिव्य आणि प्रथमच महाबली हनुमान वेषभूषेत पात्रधारी व विविध आकर्षण देखाव्याला पहाण्यासाठी नागरीकांचा जनसागर लोटल्याणी शक्यता असतांनाच तेथे संपूर्ण कार्यक्रमात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी साकोली पोलीस ठाणे निरीक्षक राजेश थोरात यांनी साकोली बस स्थानक ते झेंडा चौक सेंदूरवाफा / साकोली पर्यंत ६० ते ७० पोलीसांची तुकडी घेऊन कडक बंदोबस्तात रूट मार्च काढला. जेणेकरून या डेमो लॉंग मार्चमुळे शहरातील वातावरण शांततामय ठेवण्यासाठी विशेष योगदान देण्याचे जनतेला विनंती आवाहन केले आहे. सदर भव्य दिव्य शोभायात्रा सेंदूरवाफा झेंडा चौक ते शहरातील मुख्य मार्गाने प्रगती कॉलनी चौक – बस स्थानक चौक – एसबीआय चौक, तुमसर एकोडी चौक – जूने पंचायत समिती पोलीस ठाणे चौक – न्यायालय मार्ग टि पॉईंट लाखांदूर रोड आणि श्रीराम भक्त श्री हनुमान मंदीरात येथे समापन होऊन याप्रसंगी भव्य आकाशतरंगात फटाका शो होणार आहे. लाखांदूर रोड चौकात श्रीराम हिंदू युवा मंच कडूनही विशेष आकर्षण व महाप्रसाद आणि शोभायात्रेतील भक्तभाविकांसाठी शरबत वितरण करण्यात आले आहे. या पोलीस बंदोबस्तात शांतता व सलोखा कायम ठेवण्यासाठी आवाहन केलेल्या रूट मार्च मध्ये साकोली पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात, सहा. पोलीस निरीक्षक संजय खोकले, सुनील उईके, पोलीस उपनिरीक्षक धिरज खोब्रागडे, संजय पाटील यांसह ३० पोलीस अंमलदार, २५ होमगार्ड पथक रूटमार्चला कर्तव्यदक्ष हजर होते. येथे वाहतूक पोलीस हवालदार अश्विन भोयर यांनी वाहतूक व्यवस्था सांभाळली व लोकेशन रूटवर पोलीस नायक स्वप्निल गोस्वामी, किशोर फुंडे, राजेंद्र कुरूडकर, सचिन कापगते, चंदू थेर, गुलाब घासले, नैताम, आमितेश वडेट्टीवार, राजेश भजने आदींनी बंदोबस्तात सहकार्य केले. पोलीस विभागाकडून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जनहितार्थ सोशल न्यूज प्रसारण साकोली मिडीयाचे आशिष चेडगे यांनी केले.