बिबट्याच्या दाता सह दोन आरोपीं स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

87

बिबट्याच्या दाता सह दोन आरोपीं स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 11 फरवरी 2023
रिपोर्ट:- जिला संवाददाता, चंद्रपुर

सविस्तर बातमी:-  दि. 10 फरवरी 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना गोपनिय माहिती मिडाली की, बेनार चोक मल्लेलवार देशी दारूचे दुकानाचे बाजुला एक इसम वाघाचे दात स्वतः जवछ बाळगुन ते विकण्या करीता फिरत आहे. अशा खबरे वरून वनपरकक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन चंद्रपूर वन विभाग , चंद्रपूर श्री. आर:डी.घोरूडे व त्यांचे पथकांना पाचारण करून मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने स.पो.नि.बोबडे व स.पो.नि.भोयर यांचे अधिपत्या खाली दोन पथक तयार करून मिळालेल्या खबरे प्रमाणे बेनार चौक मल्लेलवार देशी दारूचे दुकाना जवछ गेले असता तेथे खबरे प्रमाणे इसम नामे प्रविण नरसय्या बोडू वय 34 वर्ष रा.लालपेठ कॉलरी नं.03 रेलवे लाईन जवल, चंद्रपूर हा मिळुन आला त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे फुलपँन्टचे खिशात एका प्लैंस्टीक पिशवी मध्ये वन्य प्राण्याचे दोन दात मिळुन आले. ते सोबतचे वनपरिकक्षेत्र अधिकारी श्री.घोरूडे सा. यांनी पाहीले असता ते दात हे वन्यप्राणी बिबट याचे असल्याचे प्रथमदर्शनी सांगीतले. सदर दोन्ही दात पंचासमक्ष पुराव्या कामी जप्त करून ताब्यात घेतले असून नमुद इसमा विरुद्ध वनकायदया अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

और खबर पढ़ें 👇👇👇


RTO आरटीओ निरीक्षकासह दलाल एसीबीच्या जाळ्यात, चेकपोस्‍टवर करत होते अवैध वसुली !


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचेमार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, स.पो.नि.मंगेश भोयर , वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.घोरूडे , पो.हवा. धनराज करकाडे, प्रमोद डंबारे, ना.पो.कॉसंतोष येलपूलवार, दिनेश अराडे, पो.कॉ.नरेश डाहुले, गोपाल आतकुलवार, रविंद्र पंधरे, प्रांजल झिलपे, कुंदन बावरी, नितीन रायपुरे व वनविभागाचे पथक यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास वनविभाग, चंद्रपूर हे करीत आहे.