क्राईम ब्लास्ट :- माढेळी सट्टाकिंग सुरेंद्र कुलसंगे कडून ठाणेदाराला मेजवानी ? पोलिसांच्या संरक्षणात माढेळी परिसरात चालतो खुलेआम सट्टा?

165

क्राईम ब्लास्ट :- माढेळी सट्टाकिंग सुरेंद्र कुलसंगे कडून ठाणेदाराला मेजवानी ?

पोलिसांच्या संरक्षणात माढेळी परिसरात चालतो खुलेआम सट्टा?

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या माढेळी या गावात मागील अनेक वर्षांपासून सुरेंद्र बळीराम कुलसंगे हे पोलीस आरक्षणात मोठ्या प्रमाणात सट्टापट्टी चालवीत असल्याची माहिती असून तो सट्टाकिंग ठाणेदार खोब्रागडे यांना लाव्हे तितर ही पाखरं खाण्यासाठी पुरवीत असल्याची पण चर्चा असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एरव्ही सर्वसामान्य जनतेला पोलिसांकडून योग्य न्याय मिळत नसताना अवैध व्यावसायिकांना मात्र हे पोलीस प्रशासन कसे काय संरक्षण देतात हा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात सुरेंद्र कुलसंगे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे गुप्त तक्रार झाली असल्याची माहिती असून आता ठाणेदार खोब्रागडे सेवानिवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर असतांना त्यांचे कारनामे पोलीस विभागात चर्चेचा विषय बनत आहे.

वरोरा शहारात जेंव्हा मोपानी हे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आले होते तेंव्हा अवैध धंद्यावर पूर्णपणे अंकुश लावला गेला होता पण जसे ते ट्रेनिंग करिता बाहेर गेले तेव्हापासून ठाणेदार खोब्रागडे यांच्या संरक्षणात अवैध धंद्यांना जणू उधाण आले आहे. ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन अवैध व्यावसायिकांचे बल्ले बल्ले सुरू आहेत आता माढेळी गावातील कुळसंगे या सट्टाकिंग याच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात यावर वरोरा तालुक्याचं सामाजिक स्वास्थ्य अवलंबून आहे.

महिलांसाठी असलेल्या मुत्रिघरा समोर चालतेय सट्टापट्टी ?

  • माढेळी गट ग्रामपंचायत प्रशासनाने महिलांसाठी जे नव्याने मुत्रिघर बांधले आहे तिथे जवळच सट्टापट्टी चालत असल्याने महिलांना मोठी अडचण होत आहे, याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे मात्र याचा समाजमनावर मोठा परिणाम होत असल्याने वरिष्ठांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.