आदिवासी बांधव भडकताचं कार्यक्रमातून काँग्रेस अध्यक्षाचे कार्यकर्त्यासह पलायन घुग्घुस येथे आदिवासी बांधवांच्या खावटी वाटत कार्यक्रमात उडाला गोंधळ

81

आदिवासी बांधव भडकताचं कार्यक्रमातून काँग्रेस अध्यक्षाचे कार्यकर्त्यासह पलायन

घुग्घुस येथे आदिवासी बांधवांच्या खावटी वाटत कार्यक्रमात उडाला गोंधळ

चन्द्रपुर/महाराष्ट्र

सविस्तर बातमी:- शुक्रवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान येथील जि.प. शाळेत आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक प्रादेशिक कार्यालय-चंद्रपूर व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय-चंद्रपूर जि. चंद्रपूर (यांच्या संयुक्त विद्यमाने) अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजने अंतर्गत अन्नधान्य किट वाटप वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सकाळी अनुदानित आश्रम शाळा केंद्र दुर्गापूर येथील शिक्षकांसह खावटी वाटप करण्यासाठी पाठवण्यात आले.

घुग्घुस काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष या शासकीय कार्यक्रमात बिना बोलावता सहभागी झाले.

  • आदिवासी समाजाचे नकोडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश राजगडकर क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा आदिवासी संस्था नकोडा उपाध्यक्ष राकेश तिरणकर, सचिव विकास मेश्राम यांनी या कार्यक्रमात बिना बोलावता काँग्रेस नेते आल्यामुळे संताप व्यक्त केला. हा काही राजकीय कार्यक्रम नाही असे सुनावले, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आदिवासी बांधवांचा रोष बघून घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष यांनी तेथून पलायन केले.
    हि माहिती मिळताच घुग्घुस पोलीस येथे दाखल झाले.

 

आदिवासी बांधवांचा वाढता रोष पाहता काँग्रेस नेत्यांनी कार्यक्रमातून पळ काढला.

  • याप्रसंगी रोष फक्त करताना आदिवासी बांधव म्हणाले की आदिवासी समाजाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला घुगुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना सुद्धा बोलावण्यात आले नाही. काँग्रेसचे नेते जबरदस्तीने आले त्यांनी भाषणबाजी केली. आम्हीच केले अशी बतावणी केली, त्यामुळे आदिवासी बांधव संतप्त झाले. शाळेत कुठलीही व्यवस्था नव्हती, लोकांनी काँग्रेस नेत्यांना फक्त बाता न मारता, हा राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून इथे राजकारण करू नये असे सुनावले.
  • प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रकल्प विकास अधिकारी शैलेंद्र खडसे यांच्याशी संपर्क साधला असता कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला या कार्यक्रमात बोलाविले नाही असे त्यांनी सांगितले.

घुग्घुस, नकोडा, म्हातारदेवी, उसगाव येथील आदिवासी विभागातील पात्र लाभार्थ्यांकरिता महाराष्ट्र शासनाची खावटी अनुदान योजना रु.2,000 इतके अनुदान लाभार्थ्यांचे खात्यात थेट जमा व उर्वरित अंदाजे रु. 2,000 चे अन्नधान्न कडधान्न व इतर जीवनावश्यक वस्तूंची किट वाटत करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यादी नुसार उसगावसाठी 34 नकोडा साठी 44 घुग्घुस साठी 98 किट वाटप करण्यात आले.