नकोडा येथील पाण्याच्या टाकीचे साहित्य चोरीच्या प्रकरणीत आरोपी मोकटाच   आरोपीना पकडण्यात घुग्घुस पोलिसांना अपयश

170

नकोडा येथील पाण्याच्या टाकीचे साहित्य चोरीच्या प्रकरणीत आरोपी मोकटाच

आरोपीना पकडण्यात घुग्घुस पोलिसांना अपयश…!

चन्द्रपुर/महाराष्ट्र

सविस्तर बातमी:- शनिवार 7 ऑगस्ट रोजी फिर्यादी महेंद्र पुंडलिक बोढे वेकोली सुरक्षा प्रहरी रा. इंदिरानगर, घुग्घुस यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन गाठून अज्ञात भंगार चोरट्यान विरुद्ध तक्रार दिली परंतु एक आठवड्याचा कालावधी लोटून सुद्धा अज्ञात भंगार चोरट्याना पकडण्यात घुग्घुस पोलिसांना उपयश आले आहे.

 

शुक्रवार 6 ऑगस्ट रोजी रात्री 12:45 वाजता दरम्यान भंगार चोरट्यानच्या टोळीने घुग्घुस येथून जवळच असलेल्या नकोडा येथील वेकोलीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या आवारात प्रवेश करून गॅस कटरने लोखंडी टाकीचे साहित्य कापून चोरून नेले.

ही माहिती वेकोलीच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी सुरक्षा रक्षकांना घटनास्थळी पाठविले घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नकोडा येथील वेकोलीच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात चोरट्यानी एका लोखंडी टाकीचे पत्रे कापून नेल्याचे दिसले व एक पूर्णतः कापून चोरीस गेल्याचे दिसले व चार चाकी वाहनाच्या टायरच्या खुणा दिसल्याने घुग्घुस पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली.

 

 

नकोडा येथील पुरवठा करण्यासाठी वेकोलीची जुनी पाण्याची टाकी आहे येथील वार्ड क्र 4 व 5 मधील नागरिकांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आली आहे. एक ते दीड महिन्यापासून ही पाण्याची टाकी बंद आहे.

आता पर्यंत लाखो रुपयाचे भंगार साहित्य चोरीस गेलेआहे टाटा सुमो, मालवाहक वाहनाने भंगार चोरण्यासाठी चोर तिथे जातात.

 

 

हे प्रकरण पोलिसांनी तपासात ठेवले आहे

घुग्घुस येथील भंगार चोरांवर अनेक पोलीस ठाण्यात अनेक भंगार चोरीचे गुन्हा दाखल आहे भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो शस्त्रच्या धाकावर चोरी करण्यात येते राष्ट्रीय संपत्तीची चोरी, कोळसा चोरी करण्यात येते त्यामुळे घुग्घुस येथील भंगार चोरांना तडीपार करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.