देशी विदेशी दारूच्या ट्रक मधुन पेट्या जप्त करून आरोपीस अटक केली.

549

देशी विदेशी दारूच्या ट्रक मधुन पेट्या जप्त करून आरोपीस अटक केली.

चन्द्रपुर/महाराष्ट्र

दि. 02 जुलाई 2021

रिपोर्ट:- हनिफ शेख संवाददाता

सविस्तर बातमी:- शुक्रवार 2 जुलै रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान घुग्घुस चंद्रपूर मार्गांवर घुग्घुस गुन्हे शोध पथकाने सापळा रचून देशी विदेशी दारूच्या 12 पेट्या जप्त करून आरोपीस अटक केली.

ट्रक क्रमांक एमएच 34 एम 5023 दहा चाकी ट्रक मध्ये देशी विदेशी दारूच्या 12 पेट्या वणी तालुक्यातून चंद्रपूर मार्गे बल्लारशाह कडे जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून चालक आरोपी सईद अहमद खान (52) रा. रवींद्र नगर, कारवा रोड बल्लारशाह यास अटक केली.

देशी विदेशी दारू किंमत 1 लाख 95 हजार व ट्रक किंमत 10 लाख असा एकूण 11 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाही पो.नि.राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस गुन्हे शोध पथकाचे सचिन बोरकर, रंजित भुरसे, महेंद्र वन्नकवार, नितीन मराठे, ज्ञानेश्वर जाधव, सचिन डोहे यांनी केली.