साकोलीजवळ मोहगाटा जंगलात अपघातात तरूणाचा मृत्यू

158

मोहगाटा जंगल महामार्गावर अपघातात तरूण ठार •

जनतेने धरले उड्डाणपूल निर्माण कंपनीला धारेवर • साकोली जवळील घटना •

🔘 साकोली / महाराष्ट्र
Tue. 22. 08. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

🔳 साकोली : सोमवार २१ ऑगस्टच्या रात्री १ वा. दरम्यान साकोलीहून भंडाराकडे दूचाकीने जाणा-या युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर मोहगाटा जंगलात सराटी फाट्याजवळ घडली आहे. यात काही नागरीकांनी या रोडवर सुरक्षा ठेवण्याची जबाबदारी सदर उड्डाणपूल निर्माण कंपनीची आहे व कंपनीच्या निष्काळजीपणाने येथे अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचा बळी गेला असा आरोप यावेळी केला जात आहे. तर साकोली पोलीसांनी घटनेची नोंद करून मृतक शव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
🔳 गोविंद किशोर सोरते ३४ रा. शिवाजी वार्ड साकोली असून एन्फील्ड बुलेट क्र. एम एच ३५ एयू ५७१८ ने सोम. २१ ऑगस्ट रात्री १ सुमारास महामार्गाने मोहगाटा जंगलातून भंडाराकडे जात होते. सराटी फाट्याजवळ विपरीत दिशेकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे मंगळवारी २२ ऑगस्टला सकाळी समजले. या महामार्गावर नविन उड्डाणपूलाचे निर्माण कार्य प्रगतीपथावर आहे. पावसाळ्यात हा एकेरी वाहतूक रोड असून जंगलमार्ग असलेल्या या रोडवर मागेही कितीतरी अपघातात बळी पडलेले आहेत. साकोली पोलीस ठाणे निरीक्षक राजेशकुमार थोरात यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय हेमणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून ते व चमु या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.