जनतेला विमा सुरक्षा देण्यासाठी अभिकर्ता प्रशिक्षण शिबिर

32

🔘 जनतेला विमा सुरक्षा देण्यासाठी अभिकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर •

🔘 साकोलीत विमा योजनांची पुरेपूर दिली माहिती •

साकोली / महाराष्ट्र
Ths. 24. 08. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

🔳 साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या साकोली शाखा अंतर्गत पुजा नरेश कुरंजेकर सी एल आय ए ग्रुपचे प्रशिक्षण शिबीर बुध.( २३ ऑगस्ट ) स्टे इन हॉटेल साकोली येथे पार पडले.
🔳 यात विमा अभिकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्यामागच्या उद्देश ग्रामीण भागातील जनतेला विम्याचे महत्व पटवून देणे व प्रत्येक जनतेला विमा सुरक्षा प्रदान करणे हे आहे. याकरीता एल आय सी साकोली शाखेच्या वतीने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये ३० अभिकर्त्यानी भाग घेतला या सर्वांना मार्गदर्शन करण्याचे काम साकोली शाखेचे शाखाधिकारी महेश पांढरे यांनी केले. त्यांनी विमा अभिकर्त्याचा उत्साह वाढविला. त्यांना पॉलिसी बद्दल माहिती सांगितली व दसरा दिवाळीच्या शुभ पर्वावर अभिकर्त्याना जास्तीत जास्त पॉलिसी कशा प्रकारे करता येईल यावर विशेष भर दिला. चंदु लिखार यांनी मार्केटची परिस्थिती बिकट असतांनी सर्व नवीन अभिकर्त्याना पॉलिसी कशा प्रकारे करायची व स्वतःचा व्यवसायात भर करून ग्रामीण भागातील लोकांना विमा सुरक्षा देण्याचा गृहमंत्र अभिकर्त्याना दिला. पुजा कुरंजेकर यांनी उपस्थित सर्व अभिकर्त्याचे व साकोली शाखेचे शाखाधिकारी महेश पांढरे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याबदल आभार मानले.