वाळूचोरीत रात्रंदिवस मूकप्राण्यांवर अमानुष मारहाणीचा अत्याचार

76

🛑 वाळूचोरीत रात्रंदिवस मूकप्राण्यांवर अमानुष मारहाणीचा अत्याचार •

मूक प्राणी सुरक्षा अधिनियमांची साकोलीत ऐशीतैशी • रात्रंदिवस बैलांना राबवून करतात नदीपात्रात प्राण्यांना निर्दयतेने मारहाण •

🔘 साकोली / महाराष्ट्र
Tue. 17. 08. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

🔘 साकोली : मूक प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रकरणी कित्येक वर्ष बैलांच्या शर्यतीवर उच्च न्यायालयाने निकाल दिलेला नव्हता व आजही बैलांची शर्यत सुरू झाली परंतू कडक नियम पाळूनच अन्यथा यात गंभीर स्वरूपाचा गुन्हाच दाखल होऊन अटकेचे प्रावधान आहे. दूसरीकडे हे नियम साकोलीत धाब्यावर बसवून सर्रासपणे भारतीय न्यायसंहितेची पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक व संतप्त प्रकार काही वर्षांपासून सुरू असून याकडे शासनाचे व पशुसंवर्धन सुरक्षा विभागाचे दूर्लक्ष असल्याची माहिती निदर्शनास आली आहे. या धक्कादायक प्रकाराने धारा ४२८, ४२९ पशुक्रुरता अधिनियम १९६० भारतीय दंड संहिता कलमांची सर्रासपणे ऐशीतैशी होत आहे.
🔘 सविस्तर की साकोली शहरासह विविध भागात रात्रीपासून पहाटेपर्यंत जवळील चुलबंद नदीपात्रातून १०० ते १५० बैलबंडीनी अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे. हि महसुली चोरी आहे हे महसुल विभागालाही चांगलेच ठाऊक आहे. पण धक्कादायक प्रकार हा की सदर नदीपात्रातून वाळू उपसा झाल्यानंतर बैलगाडी रेतीतून व पाण्यातून वर चढवितांना मूक प्राणी बैलांना अमानुषपणे मारहाण केली जात आहे. यात क्षमतेपेक्षा जास्त वाळू लादून बैलगाडी वर चढवितांना बैलांना तोंडातून फेस येईपर्यंत अमानुषपणे मारहाण करतात, यातच बैलगाडी रात्रीपासून पहाटेपर्यंत व दिवसभर बैलांना राबवून अडचणीच्या व चढणीच्या जागेंवरून काठीने झोडपून काढले जात असल्याचे विदारक चित्र सध्या सर्व जनतेपूढे व प्रशासनापुढे दिसत असून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असूनही प्रशासनाच्या लक्षात हे मूक प्राणी सुरक्षा अधिनियमांची जाणीव का झाली नाही.? या गंभीर स्वरूपाचा गुन्ह्यात भारतीय मूक प्राणी अत्याचार धारा ४२९, पशु संरक्षण ४१०, पशुक्रुरता अधिनियम कलम ११, भादवि ४२८ प्राण्यांना अमानुषपणे मारहाण अधिनियम १९६० भारतीय संविधान अनुच्छेद ५१ ( अ ) नुसार प्राण्यांप्रती सहानुभूती ठेवणे अशी दंड संहिता नियम असून यात प्रिवेंशन ऑफ क्रुएलिटी ऑन एनिमल्स धारा ( पीसीए ) १९६०, जनावरांना पर्याप्त भोजन पाणी, दिर्घकाळ राबविणे, बांधून ठेवणे, निर्दयतेने वागणूक देऊन क्रुरतेने मारहाण करणे हा पशुक्रुरता आणि मूक प्राण्यांचा छळ करणे, जनावरांना असुविधेत ठेऊन, इजा पोचविणे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. यात दोषी आरोपींना अटकेची कारवाई, ३ महिने तुरूंगवास व दंड किंवा दोन्ही अशे प्रावधान असूनही साकोली शहरात दररोजच्या आवागमनात सकाळी सायंकाळी पहाटेपासून हे विदारक चित्र कुंभली धर्मापुरी चुलबंद नदीपात्रात प्राण्यांना अमानुषपणे मारहाण करण्याचा गंभीर प्रकार सर्रासपणे सुरू आहे.
🔘 बैलांना दिवसरात्र राबवून हे हैवानीकृत्य करणारे काही बैलगाडी चालक नदीपात्रातून जड बंडी चढविण्यासाठी मूक बैलांना काठीने क्रुरतेने झोडपून काढतात अशेच चित्र बुधवार १६ ऑगस्ट सायं. ०५:२४ वा. चुलबंद नदीघाटावर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या शहर काँग्रेस उपाध्यक्ष दिलीप निनावे, विलास मासुरकर व शोकसभेला आलेल्या शेकडो नागरिकांनी हा मुक प्राण्यांना अमानुषपणे मारहाण आणि क्रुरतेचा संतापजनक प्रकार अनुभवला. सदर संतापजनक प्रकारात भारतीय प्राणी सुरक्षा अधिनियमांची साकोलीत सर्रासपणे ऐशीतैशी होत असून यात दंडात्मक कारवाईची तरतूद असूनही सदर बाबतीत प्राणी सुरक्षा विभाग, पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनाही यांची जाणीव झाली नाही काय.? असा आरोप जनतेने केला असून या प्राण्यांच्या सुरक्षा कायद्यात तातडीने अंमलबजावणी करीत मूक प्राण्यांना अमानुषपणे मारहाण व निर्दयतेच्या संतप्त प्रकारावर आळा घालण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी विभाग व जिल्हा पोलीस यंत्रणेने ठोस पाऊले उचलावी अशी मागणी केली जात आहे.

[ सदर ग्लोबल महाराष्ट्र न्यूज बातमीची कृपया कॉपी चोरी करू नये • Warning Do not 🚫 Copy this Global Maharashtra News Media ]