साकोली शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण उत्साहात

58

साकोली शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण उत्साहात •

प्रत्येक युवकांचा बाईकवर दिसला तिरंगा जल्लोष •

साकोली / महाराष्ट्र
WED. 16. 08. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 साकोली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त साकोली शहरातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात पार पडले. मंगळवारी सकाळपासूनच प्रत्येक युवकांचा सहभाग तिरंगा बाईकसह शहरातील चौकाचौकात “भारत माता की जय” घोषणांनी शहर तिरंगामय केले होते हे विशेष.
🔳 साकोली शहरात दिवाणी न्यायालयात न्यायमूर्ती मा. एन. पी. तळणीकर न्यायाधीश यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात, तहसील कार्यालय येथे तहसीलदार निलेश कदम, जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक शाळा क्रं 01 येथे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रकाश कोवे, साकोली पंचायत समितीत खंडविकास अधिकारी जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय एसडीपीओ सुशांत सिंह, नगरपरिषद येथे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीपकूमार गजभिये, तालुका कृषी कार्यालयात अधिकारी सागर ढवळे, राज्य परिवहन महामंडळ आगारात आगार व्यवस्थापक सचिन आगरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर सर्वात मुख्य होमगार्ड परेड मैदानावर उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार निलेश कदम, पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, नायब तहसीलदार अनिता गावंडे, एस.सी. शेंडे, जयश्री रंगारी, अरूणा देशभ्रतार, निरीक्षक अधिकारी रविंद्र उन्हाळे यांसह सर्व शासकीय अधिकारी, शाळा महाविद्यालयातील शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि अध्यापक होमगार्ड परेड मैदानावर उपस्थित राहून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.