• नवनिर्मित उड्डाणपूल का गळतो..? साकोलीत जेएमसी करून गेली भोंगळ कारभार..!

45

📕 नवनिर्मित उड्डाणपूल का गळतो.?

📕 एनएचएआय ला कुणी तक्रारही केली नाही.! साकोलीत जेएमसी करून गेली भोंगळ कारभार..!

◾ साकोली / महाराष्ट्र
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी : साकोली – दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या साकोली येथील उड्डाणपूल पावसाळ्यात का गळतो.? यावर जागरूक नागरिकांनी दरवर्षी फक्त प्रश्णांचा भडीमार उपस्थित केला होता. पण याचे नेमके कारण काय व राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण ( NHAI ) यांकडे कधी तक्रारही केली आहे काय.? असा प्रश्न पडला असून दरवर्षी पावसाळ्यात साकोली शहरातून वरून पाण्याच्या अक्षरक्ष: धारा लागतात पण या गंभीर व संतापजनक प्रकाराकडे कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही असे दिसून येते आहे.
🔳 भारतीय राष्ट्रीय राजमार्ग विकास प्राधिकरणने सदर उपजिल्हा रुग्णालय ते सेंदूरवाफा उड्डाणपूलाचे कार्य जेएमसी कंपनीला दिले होते. ते कार्य २०२१ – २२ मध्ये पूर्ण झाले. पण पहिल्याच पावसाळ्यात उड्डाणपुलच्या खालून दर वीस ते चाळीस मीटरवर पाण्याच्या धारा लागतात. हा प्रकार तर व्हायला नको होता. पण जेएमसीच्या चूकीचे हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. उड्डाणपूलावरून जे सपोर्ट कॉलम लागलेले आहेत व पिल्लरवर ज्या ज्या ठिकाणी जोड आहेत त्या ठिकाणी स्टीक इमल्शन लिक्वीडचा वापर कमी केलेला आहे याने वरील बाजूंनी पाणी साईड शोल्डरतून काही वॉटरपास होल पाईपलाईनने सरळ खाली उतरत आहे व त्या त्या ज्वॉईंटवरून कमी लिक्वीड टाकल्याने पाणी झिरपून सर्वत्र धारा लागत आहेत. हा सर्व प्रकार साकोलीकर दोन वर्षांपासूनच उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत पण कुणीही वरीष्ठांपर्यंत अथवा राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यांना साधी तक्रारही देण्यासाठी धाडस दाखविले नाही. सदर कार्याला जनतेचे व शासनाने कोटींच्या वर पैशे लागलेले आहेत पण या जेएमसी कंपनीच्या भोंगळ कारभार व अनियमिततामुळे करोडोंच्या नवनिर्माण उड्डाणपूलाची आज दैन्यावस्था व ऐशीतैशी होत आहे व हा प्रकार जनताही उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. याला एक शोकांतिका म्हणावे की लाचार प्रशासन की सुस्त जनता..?

📡 Do Not 🚫 Copy this Global Maharashtra News.