• साकोलीत गोंदिया – नागपूर बसला पहाटे अपघात

91

गोंदिया – नागपूर बसला पहाटे अपघात

साकोलीत ट्रिपलसीट विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी चालकाने स्वप्राण टाकले धोक्यात • चालक जखमी • संपूर्ण प्रवासी सुरक्षित

◾ साकोली / महाराष्ट्र
FRI. 23. 06. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

⭕ सविस्तर बातमी : साकोली : आज शुक्रवार २३ जून पहाटे ०५:४५ ला गोंदिया – नागपूर जाणारी बससमोर चौकात अचानक दूचाकीवर तीनसीट विद्यार्थ्यांनी वळण घेतल्याने बसचालकानी त्यांना वाचविण्यासाठी चालकाने आपले प्राण धोक्यात टाकून बस डिव्हॉयडरवर नेऊन चढविली आणि तीन विद्यार्थ्यांसह आतील बसलेल्या प्रवाशांनाही इजा मात्र होऊ दिली नाही पण चालकाच्या पायाला गंभीर स्वरूपाची इजा झाली असून चालकाला साकोली आगार व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
⭕ आज शुक्रवार २३ जून पहाटे ५:४५ ला साकोली बसस्थानकावरून गोंदिया – नागपूर बस क्र. एम एच ४० एक्यू ६०८० ही शहरातील नगरपरिषद चौकात जलदगतीने आली असता पश्चिम दिशेने अचानक दूर्गा मंदिर रोडाने शिकवणी वर्गाला जाणा-या दूचाकीवर तीन सीट विद्यार्थ्यांनी वळण घेतले, समोर अचानक बस पाहून विद्यार्थ्याने गोंधळून इकडे तिकडे वळण घेतले त्यातच तरबेज बसचालकानी त्यांना वाचविण्यासाठी एसटीचे जोरदार ब्रेक लावित संतूलन ढासळले आणि चालकाच्या प्रसंगावधानाने बस डिव्हायडरवर चढविली. यात डिव्हायडर वरील लोखंडी ग्रील ही बसच्या चालक कक्षेला भेदून लोखंडी रॉड आत घूसून चालकाच्या पायाला जबरदस्त गंभीर जखमी झाली. यावेळी बसमध्ये ७ ते ८ प्रवासी भंडारा नागपूर प्रवास करीत होते. आणि ते तीनसीट अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गाडी वळवून तिथून पोबारा केला. असे प्रत्यक्षदर्शी प्रभात पावली जाणारे विलास मासुरकर यांनी सांगितले. तातडीने मासुरकर यांनी बस वाहकाच्या मदतीने साकोली बसस्थानक येथे फोन लावित जखमी चालकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. व प्रवाशांसाठी साकोली आगाराची दूसरी बसची व्यवस्था केली गेली. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी चालकाच्या प्रसंगावधानाची व समयसूचकतेची प्रशंसा करून स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन विद्यार्थ्यांसह बसलेल्या प्रवाशांना एकही धक्का लागू दिला नाही हे विशेष. अश्या घटनेत पालकांची एक घोडचूक समोर आली आहे की अल्पवयीन आणि वाहन विना परवाना विद्यार्थ्यांना दूचाकी देणे हे वाहतूक नियमाने गंभीर स्वरूपाचा गुन्हाच असून याप्रकारे आपल्या मुलांसह इतरांच्या जीवाशी खेळणा-या अश्या बेजबाबदार पालकांवरच साकोली वाहतूक पोलीसांनी तात्काळ कारवाई करण्याची नितांत गरज असल्याचे यावेळी नागरीकांनी सांगितले आहे. कारण सदर घटनेत आज मोठा जिवीतहानीचा धोका एका तरबेज बस चालकाच्या समयसूचकतेने टळला आहे.