विद्युत पुरवठा खंडित होवुनये म्हणून उपाययोजना करा..

47

विद्युत पुरवठा खंडित होवुनये म्हणून उपाययोजना करा..

 

महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना भाजपाचे निवेदन

 

चंद्रपूर/महाराष्ट्र 

दि. 22 मई 2024

रिपोर्ट : अनुप यादव ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 

सविस्तर बातमी :- मान्सुनचे दिवस बघता जिल्ह्यातील तसेच शहरातील विज पुरवठा खंडीत होवू नये त्याकरीता अधिकाऱ्यांना द्याव्या.यासाठी विशेष उपयोजनांचे नियोजन करावे,अशी मागणी महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे करण्यात आली आहे.

यावेळी भाजपा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू,किरण बुटले,भाजपा नेते संदीप आगलावे,पुरुषोत्तम सहारे,रवी लोणकर,मनोज पोतराजे, विवेक शेंडे व बबन राऊत यांची उपस्थिती होती.

यावेळी चर्चे दरम्यान प्रज्वलंत कडू म्हणाले, मान्सुनला सुरूवात होत आहे. वादळी वारा व पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळेस ठिकठिकाणी असलेले ईलेक्ट्रीक पोलवरती झाडाच्या फांद्या विद्युत वहिनीला स्पर्श करतात व विद्युत पुरवठा खंडित होतो.अथवा डीपीवर ईलेक्ट्रीशी संबंधीत मेंटेनन्सची कामे पावसाळ्यापुर्वी करने गरजेचे आहे. याकरीता आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना बैठक करून सुचना देण्याचे करावे.अशी मागणी यावेळी करण्यात आली.पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता महावितरणने घ्यावी असेही ते म्हणाले.