पोलिसांच्या आत्महत्येने राजुरा शहरात खळबळ  

57

पोलिसांच्या आत्महत्येने राजुरा शहरात खळबळ  

गळफास घेऊन संपविले आयुष्य

मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची शक्यता 

रिपोर्ट : रमाकांत यादव जिला प्रतिनिधी • ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

दिनांक ०२/११/२०२३

सविस्तर बातमी:- राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार श्रीमंत धोंडीबा कदम वय 33 वर्ष ह्याने चुनाभट्टी वॉर्ड येथिल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

जिवती तालुक्यातील वणी येथिल रहिवासी असलेले पोलीस कर्मचारी श्रीमंत कदम हे चुनाभट्टी वॉर्ड येथे भलमे ह्यांचे घरी किरायाने वास्तव्यास होते. त्यांना मद्यपानाचे व्यसन असल्याने पत्नी जवळपास वर्षभरापासून माहेरी राहत होती. पत्नी सोबत नसल्याने ते नेहमीच मानसिक तणावात राहायचे मात्र दारू पिणे बंद केल्याशिवाय आपण परत येणार नसल्याची पत्नीची भुमिका असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून श्रीमंत कदम ह्यांच्या वागणुकीत बदल जाणवु लागल्याने घरमालकाने त्यांच्या आई व भावाला राजुरा येथे येण्याबद्दल कळविले होते. आज सकाळीच आई व भाऊ पहाड वणी येथून राजुरा येथे येणार असल्याचे श्रीमंत कदम ह्यांना माहिती होते मात्र ते येण्यापूर्वीच जवळपास 10:30 वाजताच्या सुमारास श्रीमंत कदम ह्यांनी राहते घरी गळफास घेतला.
आई व भाऊ घरी पोहचले असता श्रीमंत कदम दार उघडत नसल्याने त्यांच्या भावाने अखेरीस दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला असता त्यांना श्रीमंत कदम गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आले. त्यांनी लगेच राजुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. राजुरा पोलिसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील कारवाई सुरू आहे. श्रीमंत कदम ह्यांच्या मागे अडीच वर्षीय मुलगी, पत्नी, आई, वडील, भाऊ ह्यांचेसह बराच आप्तपरिवार आहे.