साकोली : दांडिया स्पर्धेत नागपूर प्रथम गडचिरोली दूसरे, तृतीय सेंदूरवाफा गडचांदूर

110

दांडिया स्पर्धेत प्रथम नागपूर, द्वितीय गडचिरोली, तृतीय सेंदूरवाफा •

साकोलीत दांडिया महोत्सवात लोटला महिलांचा जनसागर

🔘 साकोली / महाराष्ट्र
MON. 23. 10. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

🔳 साकोली : नवरात्रीच्या पावन पर्वावर सलग तीन दिवसीय भव्य दांडिया गरबा महोत्सव फ्रिडम युथ फाऊंडेशन दिशा फाउंडेशन, शिवदूर्गा मंदिर व सक्षम फाऊंडेशन तर्फे घेण्यात आले. यात एक्स्प्रेशन चमु नागपूर प्रथम ३१ हजार, एस आर चमु गडचिरोली द्वितीय ३१ हजार तर तृतीय युनिक समुह सेंदूरवाफा आणि महाकाल गडचांदूर ग्रुपने प्रत्येकी १५ हजारांचे पारीतोषिक प्राप्त केले. यात विशेष सहकार्य सुनील फुंडे मित्र परिवार आणि राजेश (बाळा) काशिवार मित्र परिवारांचे लाभले.
🔳 शहरातील होमगार्ड परेड मैदानावर २० ऑक्टोंबरला दांडिया स्पर्धेचे अंतिम फेरी घेण्यात आले. यातच नवदुर्गा देवी सजावट प्रतियोगिताही घेण्यात आली. कार्यक्रमात उदघाटक पाहुणे दिशा फाऊंडेशन संचलिका सरीता फुंडे, जि.प.स. रचना गहाणे, शिक्षण महर्षी डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, कॉंग्रेस शहराध्यक्ष दिलीप मासुरकर, राजेश बैस, निखिल जिभकाटे, ग्यानीराम गोबाडे, माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते, हेमंत भारद्वाज, डी.जी. रंगारी, मिना लांजेवार, प्रभाकर सपाटे, डॉ. राजेश चंदवानी, अखिलेश गुप्ता, नयन पटेल, मनोज दुबे, तरुण मल्लानी आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत विजेत्यांना प्रथम पुरस्कार ३१ हजार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, दिशा फाऊंडेशन संचलिका सरिता फुंडे, द्वितीय पुरस्कार २१ हजार अखिलेश गुप्ता मीरा लँड डेव्हलपर्स व डॉ. नितीन गुप्ता मातृछाया रुग्णालय, तृतीय पुरस्कार १५ हजार ॲड. मनिष कापगते, हेमकृष्ण वाडीभस्मे हरीश टूर्स ट्रॅव्हल्स यांकडून प्रदान करण्यात आले. नवदुर्गा देवी सजावट पुरस्कार डॉ. राजेश चंदवानी अकॅडमी हाईट्स पब्लिक स्कूल यांच्याकडून देण्यात आले. या दांडिया महोत्सवात भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर गोंदिया अशा जिल्ह्यातून सलग १० ग्रुप आलेले होते. विशेष म्हणजे गरब्याद्वारे वेगवेगळ्या सामाजिक व धार्मिक देखावे साकारली होती. हा दांडिया गरबा महोत्सव बघण्यासाठी साकोलीत परेड ग्राऊंडवर दर्शक महिलांचा जनसागर लोटला होता हे विशेष. नवदुर्गा देवी सजावट यातील प्रथम पुरस्कार तेजस्विनी हितेश उईके, द्वितीय कनक पुस्तोडे यांना प्रदान करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे परीक्षक आचल साखरे, सुरभी डुंबरे, नीतू रहांगडाले, रोशनी गुप्ता, अल्फेज खान यांनी कार्य पाहिले. कार्यक्रमात संचालन रजनी राखडे, कार्तिक लांजेवार यांनी केले. येथे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले व जि.प.स. रचना गहाणे यांच्याकडून जनरल गरबात सहभागी प्रत्येक स्पर्धकांना एक विशेष भेटवस्तू देण्यात आली व ईश्वर चिट्ठीचे आयोजन करून स्पर्धकांना रोहित मल्लानी गुरुकृपा मोबाईल शॉपी यांच्याकडून विशेष आकर्षक भेटवस्तू देण्यात आले. हा तीन दिवसीय दांडिया महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे, सचिव कार्तिक लांजेवार, मार्गदर्शक आशिष गुप्ता, स्वामी नेवारे, भावेश लांजेवार, मोहित कराडे, शुभम शेंद्रे, कार्तिक चौबे, हेमंत चांदेकर, समीर बोडगेवार, कनक गुप्ता, आचल साखरे, गीता वरकडे, तसेच संपूर्ण फ्रीडम युथ फाऊंडेशन चे सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.