साकोलीत ९ लाखांचे शाळा दुरूस्ती टेंडर ठेकेदारीत टांगले •

47

🛑 ९ लाखांचे शाळा दुरूस्ती टेंडर ठेकेदारीत टांगले •

जि. प. केंद्र उच्च प्राथ. शाळा क्रं ०१ साकोली येथील प्रकार ; “राखडे” संस्थेला ठेका होऊनही काम “वर्क ऑर्डर” मुळे थंडावले •

🔘 साकोली / महाराष्ट्र
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

🔘 साकोली : ज्या ब्रिटिशकालीन राजवटातील सर्वात प्राचीन साकोलीची जनपद शाळेतील १० जुलैच्या गंभीर घटनेत शाळेतील स्लॅब कॉंक्रीटचे तुकडे कोसळून येथील चिमुकले विद्यार्थी थोडक्यात बचावले होते व ही बातमी मुंबई मंत्रालयाच्या दालनापर्यंत पोहचली होती. आणि आता या शाळा वर्गखोली दूरूस्ती टेंडर होऊनही वर्क ऑर्डर न झाल्याने काम केव्हा सुरू होईल याकडे सर्व पालक जनतेचे लक्ष लागले आहे. सदर कामात ठेकेदारी रस्सीखेच स्पर्धा मुळे लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा काहींचा डाव आता दिसून येते आहे आणि सदर काम ठेकेदारीत टांगले गेल्याने हा डाव आता प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनीच हाणून पाडावा अशी मागणी समस्त पालक जनता व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केली आहे.
🔘 आमदार नाना पटोले यांच्या फक्त एका इशा-याने ताबडतोब सदर प्राचीन आणि सन १८६० पूर्वी स्थापित जि. प. केंद्र उच्च प्राथ. शाळा क्रं ०१ साकोली येथे ०९ लाखांचे शाळा दुरूस्ती व इतर बांधकाम मंजूर झाले. हे काम पंचायत समिती गटसाधन केंद्र कार्यालयतर्फे परसटोला येथील उदाराम राखडे यांच्या संजय बेरोजगार मजूर सहकारी संस्थेला टेंडर झाले. पण आता यात कोण ठेकेदारीत “पैसाकमाऊ” योजना राबवेल याची साकोलीत रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे येथील २२० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि यात कोण ठेकेदार बनेल अशी स्पर्धा सुरू आहे. पण मुलांच्या जीवाचे जाऊ द्या असा संतप्त आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे. कारण मागे १० जुलैला १०:३६ दरम्यान प्रार्थनानंतर व्हरांड्यातील जीर्ण इमारतीचे मोठे तुकडे कोसळून इयत्ता २ व ३ री तील चिमुकले थोडक्यात बचावले होते ही बाब काही “सेटींगबाजांना” दिसत नाही का.? कारण त्यांची मुले या शाळेत शिकत नसून “लखपती बिल्डींग” शाळेत जातात हे खरे आहे म्हणून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्या जात आहे असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कोवे, सदस्य आशिष चेडगे, अमित लांजेवार, सचिन डुंभरे आणि समस्त २२० मुलांच्या पालकवर्गांनी केला आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी येथे शिकणाऱ्या लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षा बांधकामात तरी “बोगस ठेकेदारी” व्यवसाय करू नका असा संतप्त इशाराही शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. १० जुलैचे संतापजनक प्रकरणी येथे कित्येक व्हॉट्सॲप “फोटोसेशन” नेते आपल्या सहकारींसह येऊन गेलीत पण मुख्य विषय सोडून भलत्याच विषयांची फोटोग्राफी करून शाळेतील मुलांच्या जीवाचा जीवघेणा तमाशा बनवून ठेवला होता. आणि “होऊन जाईल” अशी आश्वासनांची रद्दी खैरात वाटली होती. सदर पूर्ण परीस्थिती ही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांना माहितीही नाही अन्यथा अश्या ठेकेदारी बोगसांचा चांगलाच समाचार आ. पटोले यांनी घेतला असता.
🔘 सध्या आ. पटोले यांच्या पुढाकाराने येथे ९ लाखांचे शाळा दुरूस्ती व इतर बांधकाम टेंडर मंजूर असून लवकरात लवकर वर्क ऑर्डर काढून या कामाला सुरुवात व्हावी अशी मागणी संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यांनी केली असून मुलांच्या सुरक्षा शालेय बांधकामात बोगसपणा व पैसा खाऊ योजनेचा आरंभ करू नये असाही समितीने सल्ला दिला आहे अन्यथा शाळेत थोडाही गैरप्रकार आढळून आल्यास सर्व पालक जनतेच्या आक्रोशातून व जागेवरच यथेच्छ चोप मारहाणीला ठेकेदार व सदर टेंडर घेणारी संस्था जबाबदार राहील असा इशाराही दिला आहे.

🛑 प्रतिक्रिया |
“या शाळेचा टेंडर उदाराम राखडे परसटोला यांच्या एका सोसायटीला झाला असून अद्याप वर्क ऑर्डर निघाले नाही, कारण काम काही सोसायटीच्या लोकांनाही द्यावे लागते. हे काम ९ लाखांचे असून वर्क ऑर्डर न निघाल्याने शाळा दूरूस्ती बांधकाम थांबले आहे आणि लवकरच कामही सुरू होईल”
– आर. आर. भेंडारकर
कनिष्ठ अभियंता • पंचायत समिती ( ग. सा. केंद्र ) साकोली.