39

साकोली तालुक्यातून तुळशीदास पटले यांना शिक्षक पुरस्कार •

📕 भंडारा जिल्ह्यातील १३ शिक्षकांना पुरस्कार जाहीर •

🔘 साकोली / महाराष्ट्र
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र

🔘 साकोली : जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत २०२३-२४ करीता जिल्हा शिक्षक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. एकूण १३ शिक्षक कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार देऊन लवकरच सन्मानित करण्यात येणार आहे. यात साकोली तालुक्यातील जि. प. वरिष्ठ केंद्र शाळा साकोली क्र. ०१ चे सहायक शिक्षक तुळशीदास पटले यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंचायत समिती साकोली शिक्षण विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
🔘 जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने प्राथमिक विभागामधून सात, माध्यमिक विभागामधून पाच व एका विशेष शिक्षकाची जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता निवड केली आहे. साकोली तालुक्यात जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्रं ०१ साकोली येथील सहा. शिक्षक तुळशीदास पटले यांना सन २०२३ – २४ चा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. टि. आय. पटले हे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळोत्तेजक, शारीरिक व बौद्धिक विकास व इतर खेळांविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे अष्टपैलू शिक्षक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात हे विशेष. सदर निवड यादीस नागपूर विभागीय आयुक्तांनी मंजुरी प्रदान करण्यात आली असून एकूण भंडारा जिल्ह्यातील १३ शिक्षकांच्या या पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली आहे.
जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, मुख्य कार्यपालन अधिकारी समीर कुर्तकोटी, शिक्षण व क्रीडा माध्यमिक शिक्षणाधिकारी समिती सभापती रमेश पारधी, संजय डोर्लीकर, जि.प. सभापती मदन रामटेके, शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, महिला व बालविकास सभापती स्वाती वाघाये, प्राचार्य राजेश रूद्रकार यांकडून पुरस्कार निवड झालेल्या शिक्षकांचे कौतुक करण्यात आले आहे. तर साकोली जिल्हा परिषद केंद्र उच्च वरीष्ठ प्राथ. शाळा क्रं. ०१ चे मुख्याध्यापक डि. डी. वलथरे, सहा. शिक्षक एम. व्ही. बोकडे, आर. आर. बांगरे, बलविर राऊत, शालिनी राऊत, कार्तिक साखरे व शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षक पुरस्कार व सत्कारमूर्ती तुळशीदास पटले यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.