..वेलडन जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी..!

291

“वेलडन” जिल्हाधिकारी – मुख्याधिकारी •

राजकीय दबावाला न जुमानता केली कायद्यानुसार कारवाई •

🔘 साकोली / महाराष्ट्र
SAT. 12. 08. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज •

🔳 साकोली : कायद्यासमोर कुणीही मोठा नसतो, भारतीय राज्यघटनेतील नियम हे सर्वोच्च असते हे दाखवून दिले आहे भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व साकोली मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी..! म्हणूनच आज साकोली शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील प्रत्येक जनतेच्या तोंडून हेच वाक्य जागोजागी निघत आहेत ते म्हणजे “वेलडन जिल्हाधिकारी.. मुख्याधिकारी”.
🔳 साकोली शहरातील नागझिरा अभयारण्य रोडावरील अवैध अतिक्रमण हे शाळा महाविद्यालय व्यवस्थापनालाही गंभीर व अपघातप्रवण आणि धोकादायक वाटत होते. कित्येक दिवसांपासून साकोली शहरातीलच नव्हे तर सेंदूरवाफा येथील जागरूक जनतेनेही हा गंभीर विषय मागे मिडीयावरून उचलला होता. या वन्यजीव अभयारण्य आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय परीसरात धान्य गोदाम, प्रादेशिक पाणीपुरवठा विभाग, पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, शासकीय विश्रामगृह, दूरसंचार विभाग, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय यांसह शाळा, महाविद्यालये आहेत. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अगदी जवळच अतिक्रमणे थाटली होती. शासकीय जमिनीवर अतिक्रमण हे कायद्याच्या विरूद्ध असून याची दखल घेत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नगरपरिषद साकोली येथे याबाबद आदेश पत्र देऊन अतिक्रमणे हटविण्याची व कोणतेही मालमत्तेचे नुकसान न करता ही कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेश पत्राची तातडीने दखल घेत नुकतेच आलेले व जनतेच्या मनातील “सिंघम रिटर्न्स” मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी तडकाफडकी सर्वांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली. यातच काही राजकीय दबाव मधात आल्याचे नागरीकांनी सांगितले. पण कोणताही दबावाला न जुमानता अगदी कायद्यानुसार व नियमानुसार नागझिरा अभयारण्य रोडवरील अतिक्रमण हटविण्याची शुक्रवार ११ ऑगस्ट पासून कारवाई सुरू केली. आणि बघता बघता सर्व अवैध व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले. ही कारवाई बघण्यासाठी आलेल्या प्रत्येक जनतेने सदर कारवाईची प्रशंसा व कौतुक करीत मनात हेच शब्द सळसळत होते की “वेलडन जिल्हाधिकारी – मुख्याधिकारी”.
🔳 तब्बल २५ वर्षांनंतर साकोलीत शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी पुढाकार घेतला आहे. अतिक्रमणे हटाव मोहिमेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शासकीय कारवाईत बाधा येऊ नये करीता तिसरे सेल्यूट अभिनंदन मानावे लागेल साकोली पोलीस ठाणे निरीक्षक राजेशकुमार थोरात यांचे की जेसीबीने अतिक्रमण हटाव कारवाई सुरू असता तातडीने घटनास्थळी पोलिसांची चमु पाठवून तेथे शांतता व सुव्यवस्था निर्माण केली हे विशेष. सदर अतिक्रमण पाडीत असतांना काही सामान्य वर्गातील गरीब दूकानदारांनी लोकप्रतिनिधींकडे एकच सवाल उचलून धरला की आता ध्वस्त तर केले पण रोजगाराचे कसे.? याबाबद अश्या काही गरीब दूकानदारांना दूसरीकडे अस्थायी स्वरूपात रोजगारासाठी उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे काही गरीब रोजंदारी दूकानदारांनी बोलून दाखवित या अतिक्रमण कारवाईचेही स्वागत केले हे विशेष मानावे लागेल. कितीतरी वर्षांनी ही धडक कारवाई बघून आता परीसरातील याच प्रकारे विविध शासकीय जागेवरीलही अतिक्रमण हटविण्याची मागणी समस्त जनतेने केली असून साकोली शहरासह तालुक्यातील जनतेच्या तोंडून हेच वाक्य जागोजागी निघत आहे ते “वेलडन जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी”.